Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:03 PM2019-01-22T12:03:45+5:302019-01-22T12:04:52+5:30

 ‘सिम्बा’ स्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘गली बॉय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. होय, ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत.

mere gully mein song ranveer singh starrer gully boys new song is out | Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच!

Song Out : रणवीर सिंगच्या चाहत्यांनो, ‘गली बॉय’चे ‘मेरे गली में’ गाणे एकदा पाहाच!

googlenewsNext
ठळक मुद्देजोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार आहे. खास बात म्हणजे, या नव्या गाण्यात रणवीर डिवाईन व नैजीसोबत रॅप करताना दिसतोय.

 ‘सिम्बा’ स्टार रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘गली बॉय’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले. होय, ‘मेरे गली में’ असे या गाण्याचे बोल आहेत.
जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार आहे. खास बात म्हणजे, या नव्या गाण्यात रणवीर डिवाईन व नैजीसोबत रॅप करताना दिसतोय. हे गाणे स्वत: डिवाइन आणि नैजी या दोघांनी कम्पोज केले आहे. डिवाईन व नैजी हे दोघेही मुंबईच्या झोपडपट्टी राहिलेले आणि पुढे रॅपच्या दुनियेत धूम करणारी दोन नावे आहेत. अतिशय संघर्षाने डिवाइन व नैजीने आपली ओळख निर्माण केली. ‘गली बॉय’ हा चित्रपट मुख्यत: याच दोघांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे.


‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. येत्या १४ फेबु्रवारीला म्हणजेचं व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: mere gully mein song ranveer singh starrer gully boys new song is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.