बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया याने ११ मे २०१८ रोजी गर्लफ्रेंड सोनिया कपूूर हिच्याशी लग्न केले. सध्या हे दोघे दुबई येथे हनिमूनसाठी गेले होते. आता हे दोघे हनिमून येथून परतले असून, आपापल्या कामात व्यस्तही झाले आहेत. मात्र याचदरम्यान, हिमेशने सोशल मीडियावर हनिमूनचा एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे. सध्या इंटरनेटवर हा फोटो वाºयासारखा व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यास पसंतही केले जात आहे. 
 

यावेळी हिमेशने एक व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यामध्ये तो वर्कआउट करताना बघावयास मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘Work out mode in holiday mood! Cheers & have a great day to all! Love you.’ त्यानंतर हिमेशने सोनियासोबत आणखी एक सुंदर फोटो शेअर केला. दरम्यान, सोनिया आणि हिमेश गेल्या कित्येक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. अशी बातमी समोर येत आहे की, सोनिया लग्नानंतर आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरला गुडबाय करू शकते. सोनियाला इंडस्ट्रीपासून दूर आपल्या वैवाहिक जीवनात रममाण व्हायचे आहे. फॅमिली लाइफ एन्जॉय करण्याची तिची इच्छा आहे. 
 

दरम्यान, हिमेश रेशमिया काल रात्री उशिरा मुंबई विमानतळावर आपल्या नव्या नवरीसोबत बघावयास मिळाला. सूत्रानुसार दोघही लग्नानंतर हनिमूनच्या बहाण्याने काही महत्त्वाची खरेदी करण्यासाठी दुबईला गेले होते. आता ते मुंबईत परतले आहेत. दरम्यान, समोर आलेल्या फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. दरम्यान, जानेवारी २०१७ मध्ये हिमेश आणि त्याची पहिली पत्नी कोमल यांच्यात घटस्फोट झाला होता. आता हिमेशने सोनियासोबत लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 
 

Web Title: 'This' means a special photo of honeymoon shared, viral on the Internet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.