Mauni Roy made an item song in this film | मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात
मौनी रॉय करणार आयटम साँग ह्या सिनेमात

ठळक मुद्दे मौनीचे 'केजीएफ' चित्रपटात आयटम साँग 'गली गली में फिरता है' हे गाणे केले जाणार रिक्रिएट मौनी थिरकणार अभिनेता यशसोबत

अभिनेत्री मौनी रॉय दिग्दर्शक अयान मुखर्जीचा आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतो आहे. या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया व नागार्जुन अक्किनेनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी मौनीने अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता मौनी रुपेरी पडद्यावर आयटम साँग करताना दिसणार आहे. हे गाणे 'केजीएफ' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'केजीएफ' चित्रपटात जॅकी श्रॉफ व संगीता बिजलानी यांचा गाजलेला चित्रपट 'त्रिदेव' मधील 'गली गली में फिरता है' हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. यश आणि श्रीनिधी शेट्टी अभिनीत केजीएफ चित्रपट कन्नडसोबत पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात हिंदी या भाषेतही हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मौनी रॉय यशसोबत आयटम साँगवर ठुमके लगावताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण लवकरच गोरेगावमधील एका स्टुडिओत पार पडणार आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, या गाण्यात मौनी तीन लूकमध्ये दिसणार आहे आणि ती यशसोबत थिरकताना दिसणार आहे. हे पार्टी साँग असून हे गाणे तनिष्क बागची यांनी रिक्रिएट केले आहे.
केजीएफ सिनेमा बिग बजेटचा कन्नड चित्रपट असून हा चित्रपट गोल्ड माफियावर आधारीत आहे. मौनीला आयटम साँगवर थिरकताना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

 


Web Title: Mauni Roy made an item song in this film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.