Mastmaula Dwayne Bravo again in love! 'This' movie is going on for a Bollywood actress! | ​‘मस्तमौला’ ड्वेन ब्रावो पुन्हा प्रेमात! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट!!

आयपीएलमध्ये चेन्नईसाठी खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावो याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ब्रावो नव्याने प्रेमात पडला आहे. दुस-या कुणाच्या नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या. स्पॉटबॉयने याबद्दलचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, ब्रावो ‘इन्साईड एज’ची अभिनेत्री नताशा सूरी हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वी ब्रावो व नताशा या दोघांना एका कॉफी शॉपमध्ये एकत्र पाहिले गेले होते. सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत. या सामन्यादरम्यान नताशा अनेकदा सामना पाहण्यासाठी मैदानावर दिसली. स्टेडियमच्या व्हिआयपी बॉक्समध्ये तिला पाहिले गेले. अगदी अलीकडे नताशाने ब्रावोला चीअर करतानांची पोस्ट शेअर केली होती. तूर्तास नताशा व ब्रावो आपले नाते मान्य करायला तयार नाहीत. आम्ही केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहोत, एवढेचं ते सांगत आहेत. पण सूत्रांचे मानाल तर दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खिचडी शिजतेय. ब्रावो सध्या सिंगल आहे. नुकतेच त्याचे गर्लफ्रेन्ड रेजिमा रामजित हिच्यासोबत ब्रेकअप झालेयं. यानंतर ब्रावोच्या आयुष्यात नताशाची एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.
ब्रावोला त्याच्या मस्तमौला अंदाजासाठी ओळखले जाते. किक्रेटच्या मैदानावरच नव्हे तर डान्सच्या व्यासपीठावरही त्याने आपला जलवा दाखवून दिला आहे. कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन ९ मध्ये तो सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या नृत्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

ALSO READ :  अ‍ॅडवेंचरच्या नादात थेट नदीत जावून पडली अभिनेत्री नताशा सूरी! बंजी जंपिंग करतांना गंभीर जखमी!!

नताशाबद्दल सांगायचे तर, २००६ मध्ये नताशाने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. तिने आत्तापर्यंत सुमारे ६०० वर फॅशन शो केले आहेत.  अनेक वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. गत २३ मार्चला तिचा ‘बा बा ब्लॅक शिप’ हा विनोदी चित्रपट रिलीज झाला होता. यात ती मनीष पॉलसोबत दिसली होती. अर्थात तिचा हा चित्रपट दणकून आपटला होता. या रिलीजच्या तोंडावर नताशाला इंडोनेशियात अपघात झाला होता. बंजी जंपिंगदरम्यान ती थेट नदीत जावून पडली हेती. या अपघातात नताशाला गंभीर दुखावत झाली होती.
Web Title: Mastmaula Dwayne Bravo again in love! 'This' movie is going on for a Bollywood actress!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.