Before marrying Mahesh Bhupathi, Lara Dutta was in the live-in relationship with ... | महेश भुपतीसोबत लग्न करण्याआधी लारा दत्ता या अभिनेत्यासोबत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...

लारा दत्ताचा आज वाढदिवस असून तिचा जन्म १६ एप्रिल १९७८ ला उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे झाला. लारा दत्ता २००० मध्ये मिस युनिव्हर्स बनली आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. अंदाज या चित्रपटाद्वारे तिने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. खरे तर लारा एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती. तिने अरासत्ची हा तामिळ चित्रपट २००२ मध्ये साईन केला होता. पण चित्रपट आर्थिक संकटात अडकल्यामुळे हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. त्याआधी प्रेक्षकांना तिचा अंदाज हा चित्रपट पाहायला मिळाला. तिने आजवर नो एंट्री, काल, पार्टनर, भागम भाग, बिल्लू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
लारा ही तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकीच वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. लाराची आजवर अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत. मिस युनिव्हर्स बनण्यापूर्वी लारा मॉडेल आणि अभिनेता केली दोरजी सोबत नात्यात होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये देखील राहात होते. पण मिस युनिव्हर्स झाल्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. तिने या नात्याविषयी मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले. केलीनंतर लारा अभिनेता डिनो मोरिया सोबत नात्यात होती. डिनोप्रमाणेच लाराचे नाव इंटरनॅशनल गोल्फ खिलाडी टायगर वुड्ससोबत देखील जोडले गेले होते. पण लाराने नेहमीच आपल्या नात्यांबद्दल मीडियात मौन पाळले. लाराला बॉलिवूडमध्ये यश मिळत असतानाच टेनिसपट्टू महेश भुपती तिच्या आयुष्यात आला. महेशचे मॉडेल श्वेता जयशंकरसोबत लग्न झालेले होते. महेशने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि लारासोबत लग्न केले. २०११मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले आणि एकाच वर्षांत म्हणजे २०१२ला लाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 
लारा एक खूप चांगली अभिनेत्री असली तरी तिने तिच्या मुलीच्या जन्मानंतर चित्रपटात काम करणे कमी केले. क्रिकेटर अजहरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित असलेल्या अजहर या चित्रपटात ती झळकली होती. पण या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटीशी होती. चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा लाराला तिचा वेळ महेश आणि तिची मुलगी शायरासोबत घालवायला अधिक आवडतो. ती सध्या हाय फिव्हर या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावत आहे.  

lara dutta kelly dorjee

Also Read : ​भाभीजी घर पर है या मालिकेत या भूमिकेत दिसणार लारा दत्ता आणि अहमद खान
Web Title: Before marrying Mahesh Bhupathi, Lara Dutta was in the live-in relationship with ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.