कोणत्याही संस्कृतीमध्ये सर्वात जास्त विनोद कोणत्या विषयावर असतील ते आहेत फक्त लग्नावर! नवराबायकोच्या नात्यावर एवढे विनोद करण्यामागे कारणही तसे आहे.

कारण ‘शादी का लड्डू जो खाए वो पछताए और जो ना खाए वो भी पछताए’. आपल्याकडे गंमतीने म्हणतात ना की, एकदा लग्न केल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्याची हिंमत करणारा एकतर ‘शुर’ किंवा ‘वेडा’ असला पाहिजे.

हा विषय निघण्याचे कारण की येत्या ३० एप्रिल रोजी बिपाशा बसू अखेर लग्न करत आहे. तिचे जरी हे पहिले लग्न असले तरी होणारे ‘पतीदेव’ करण सिंग ग्रोवरचे हे तिसरे लग्न असणार आहे.

या आधी करणचा श्रद्धा निगमसोबत संसार चालला. तो मोडून त्याने जेनिफर विंटेजशी विवाह केला; पण लवकरच दोघे वेगळे झाले आणि आता तिसऱ्यांदा लग्न करण्याची तो हिंमत करत आहे.

बरं एकापेक्षा अधिक लग्न करणाऱ्या ‘शुरवीरां’च्या यादीमध्ये अनेक बॉलिवूडकर आहेत.

चार लग्न करणारे सेलिबे्रटी :

Kishore
(किशारे कुमार - मधुबाला)

चार वेळेस बोहल्यावर चढलेले कलाकार म्हणजे किशारे कुमार आणि कबीर बेदी. किशोरदांचे पहिले लग्न 1950 साली रुमा गुहाशी केले होते. त्यातून अमित कुमारचा जन्म झाला. नंतर 1960 साली मधुबालाशी विवाह केला.

तिच्या निधनानंतर 1980 साली त्यांनी योगिता बालीसोबत संसार थाटला. घटस्फोटानंतर योगिताने मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले आणि किशोदाने चौथे लग्न लीना चंद्रावरकरशी केले.

Kabir
(कबीर बेदीं -  परवीन दसंज)

पहिली पत्नी प्रोतिमा बेदीला घटस्फोट देऊन कबीर बेदींने सुझैनसोबत लग्न केले. पूजा बेदी त्याच्या पहिल्या लग्नाची मुलगी आहे. त्यानंतर निक्कीशी तिसेर आणि नुकतेच परवीन दसंजशी चौथे लग्न केले.

तीन लग्न करणारे सेलिब्रेटी :

Vidya
(सिद्धार्थ रॉय कपूर - विद्या बालन)

तीन-तीन लग्न करण्याची कामगिरी संजय दत्त, कमल हसन, अदनान समी, लकी अली आणि निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर (विद्या बालनचे पती) आणि विधु विनोद चोपडा यांनी केलेली आहे.

तिसऱ्या लग्नाची तयारी करणारे सेलिब्रेटी :

Anurag
(कल्की कोचलीन - अनुराग कश्यप)

अनुराग कश्यप आणि राहुल महाजन हे दोघे सध्या तिसऱ्या लग्नबंधणात अडकण्याची तयारी करत आहेत. दुसरी पत्नी कल्की कोचलीनशी काडमोड झाल्यानंतर अनुराग त्याच्याच एका असिस्टंटशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे तर राहुल महाजन अमृता मानेसोबत विवाह करण्याच्या विचारात आहे.

अधिक वाचा :

बिप्स अन् करणची लगीनघाई

​३० एप्रिलचा मुहूर्त! वाचा!! बिप्स-करणचे आॅफिशिअल स्टेटमेंट

Web Title: Married to a wedding AK a wedding
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.