-रवींद्र मोरे 
बॉलिवूडमध्ये आता बायोपिक बनविण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. प्रसिद्ध खेळाडूंपासून ते पॉलिटिशियनच्या आयुष्यावर चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जातो. या प्रकारच्या बदलाचे दर्शकांकडूनही स्वागत केले जात आहे. गेल्या वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकने तर धमालच केली, ज्याने १०० कोटीचा आकडा पार करुन बॉक्स आॅफिस गाजविले. आता याच धर्तीवर अभिनेत्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनत आहेत. जाणून घेऊया आगामी काळात कोणकोणत्या स्टार्सचा बायोपिक बनत आहे.  

* संजू
Related image
बॉलिवूडचा सर्वात मोठा खलनायक संजय दत्तचे आतापर्यंतचे आयुष्य वादग्रस्त ठरले आहे. तारुण्यात व्यसनांच्या आहारी गेलेल्या संजय दत्तवर मुंबई बॉम्बस्फोटमध्ये सहभागी होण्याचा आरोप होता. याप्रकरणी बरीच वर्षे केस चालली आणि नंतर त्याला जेलमध्ये शिक्षाही भोगावी लागली. एवढ्या गुंतागुंतीच्या त्याच्या आयुष्याला डायरेक्टर राजकुमार हिराणीने पडद्यावर दाखविण्यासाठी सज्ज आहे. हिराणी यांनी संजय दत्तच्या बायोपिकची निर्मिती केली असून त्याचे नाव ‘संजू’ आहे. ज्यात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्याशी जुडलेले सर्व रहस्य पडद्यावर उघड होणार आहेत. हा चित्रपट २९ जूनला रिलीज होणार आहे. 

* मीना कुमारी
Image result for meena kumari biopic
मीना कुमारी यांचे आयुष्य आणि त्यांचा मृत्यू रहस्यांशी निगडित आहे. चित्रपटात सर्वात यशस्वी अभिनेत्री असूनही त्यांचे आयुष्य एकट्यात व्यतित झाले. मीना कुमारी असे एक नाव होते ज्यांचा कसदार अभिनय पडद्यावर पाहण्यासाठी दर्शकांची उत्सुकता शिगेला पोहचत असे. मात्र पडद्यामागील त्यांचे आयुष्य कधीही कुणाला समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मीना कुमारीच्या आयुष्यावर चित्रपट बनत असून त्यांची भूमिका साकारण्यासाठी विद्या बालन, माधुरी दीक्षित, कंगना राणौत यांसारख्या अभिनेत्रींचे नाव समोर येत आहे.  

* शकीला

काही वर्षांपूर्वी बॉलिवूड आणि तमिळ अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्यावर चित्रपट बनला होता. या चित्रपटात सिल्कची भूमिका विद्या बालनने साकारली होती. या चित्रपटाला मिळलेले यश आणि दर्शकांच्या आवडीला पाहून साउथची एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीलावर चित्रपट बनविण्यात येत आहे. या चित्रपटात शकीलाची भूमिका फुकरेची भोळी पंजाबी म्हणजेच ऋचा चड्डा साकारणार आहे. शकीला आपल्या काळात सर्वात यशस्वी अभिनेत्री होती. तिचे चित्रपट चायनिज, नेपाळी आणि अन्य भाषांमध्ये डब केले जात होते.    

* सनी लियोनी

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोनीला सर्वच ओळखतात, मात्र तिचे आयुष्य पडद्यावर पाहणे म्हणजे तिच्या चाहत्यांना आनंदाची पर्वणीच ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार सनी लियोनीच्या आयुष्यावर चित्रपट बनत असून त्याचे नाव 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लियोनी’ हे निश्चित करण्यात आले आहे. यात करनजीत कौर कशी पॉर्न स्टार सनी लियोनी बनते, हे दाखविण्यात येणार आहे. अशा अभिनेत्रीचा बायोपिक बनत आहे, जिने नुकतेच चित्रपटात पदार्पण केले आहे आणि हे बॉलिवूडमध्ये क्वचितच घडले आहे. 

* आमिर खान
Related image
 काही दिवसांपूर्वी राजकुमार हिराणीने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचे जाहिर केले होते. मात्र सध्या आमिर एक पुस्तक लिहत असून ते पूर्ण झाल्यानंतर चित्रपट बनविण्याचा विचार करणार आहे. जर आमिर खानचा बायोपिक आला तर त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची पर्वणीच ठरेल. राजकुमार हिराणीने आमिर सोबत पीके आणि थ्री इडियट यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट बनविले आहेत आणि राजकुमार सध्या संजय दत्तच्या बायोपिकवरदेखील काम करत आहे. यावरुन नक्कीच आशा व्यक्त केली जाऊ शकते की, आमिरवर बायोपिक बनू शकतो.  
 
 
Web Title: Many mysteries will be revealed through the biopic of these 'stars'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.