Manoj Bajpai learned Odisha language! | ​मनोज वाजपेयी शिकला ओडिसी भाषा!

बॉलिवूडच्या प्रतिभावंत कलाकारांपैकी एक असलेला मनोज वाजपेयी लवकरच ‘बुधिया सिंह : बॉर्न टू रन’ या चित्रपटात दिसणार आहे. जगातील सर्वात कमी वयाचा मॅराथॉनपटू बुधिया सिंग याच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट म्हणजे  एक प्रेरणादायी बायोपिक आहे.  यात मनोज बुधियाचा कोच बिरंचिदास यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  या चित्रपटासाठी मनोज वाजपेयीने अनेक गोष्टी नव्याने आत्मसात केल्या. मार्शल आर्टच नाही तर ज्युडो आणि ओडिसी भाषाही त्याने शिकली. चित्रपट भुवनेश्वरच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याने मनोजने ओडिसी शिकणे गरजेचे होते. अशावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सौमिंद्र पाधी हे मनोजच्या मदतीला धावून आलेत. सौमिंद्र ओडिशाचे असल्याने त्यांनी मनोजला ओडिसी भाषा शिकण्यास मदत केली आणि विशेष म्हणजे ही त्यांची मेहनत फळासही आली.
Web Title: Manoj Bajpai learned Odisha language!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.