manisha koirala caught nana patekar red handed with Ayesha Jhulka | मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला पकडले होते 'त्या' अवस्थेत
मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला पकडले होते 'त्या' अवस्थेत

नाना पाटेकर यांनी अग्निसाक्षी या चित्रपटात मनिषा कोईराला सोबत काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. एवढेच नव्हे तर ते दोघे लग्न देखील करणार होते. मनिषा आयुष्यात येण्याआधी नाना यांचे लग्न झालेले होते. पण नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला.
नाना आणि आयशा यांनी २००३ साली आंच या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील त्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात काही इंटिमेट दृश्य देखील या दोघांवर चित्रीत करण्यात आले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे म्हटले जाते. नाना आणि आयशा नात्यात आहे हे कळल्यावर मनिषा चांगलीच भडकली होती. आयशा आणि नाना यांच्या नात्याविषयी मीडियात त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. पण मनिषाला काहीही करून नानासोबतच राहायचे होते. ती नानाच्या बाबतीत प्रचंड प्रझेसिव्ह झाली होती. एकदा मनिषा नानाला भेटायला गेली होती. त्यावेळी नानाच्या रूममध्ये आयशा होती. आयशाला पाहून मनिषाची तळपायाची आग मस्तकात गेली. मनिषा आयशावर ओरडा ओरडा करायला लागली. हे सगळे पाहून आयशा देखील चिडली. एवढेच नाही तर या दोघांमध्ये आता मारामारी होतेय का असेच नानाला वाटू लागले होते. पण नानाने मनिषाला समजावून शांत केले. या सगळ्या प्रकरणानंतर लग्न करण्यासाठी मनिषा नानाच्या सतत मागे लागली होती. पण नानाचे लग्न झाले होते आणि तो पत्नीला घटस्फोट द्यायला देखील तयार नव्हता. या सगळ्यामुळे मनिषाने त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पण मनिषा नानाच्या आयुष्यातून पूर्णपणे गेल्यानंतर नाना आयशासोबत अनेक वर्षं लीव्ह इन मध्ये राहात होता असे म्हटले जाते. 

 


Web Title: manisha koirala caught nana patekar red handed with Ayesha Jhulka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.