निव्वळ अप्रतिम...! पाहा, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:30 PM2018-12-18T14:30:16+5:302018-12-18T14:30:56+5:30

कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला.

manikarnika the queen of jhansi trailer actress kangana ranaut wins the heart | निव्वळ अप्रतिम...! पाहा, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर!!

निव्वळ अप्रतिम...! पाहा, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’चा शानदार ट्रेलर!!

googlenewsNext
ठळक मुद्देहा ट्रेलर भन्साळींच्या ऐतिहासिक चित्रपटांची आठवण करून देतो, शिवाय कंगनाच्याही मोहात पाडतो...

कंगना राणौतचा बिग बजेट सिनेमा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ  झांसी’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. या इव्हेंटमध्ये कंगना नऊवारीत पाहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यानंतर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला.
या ट्रेलरबद्दल सांगायचे तर अप्रतिम असा एकच शब्द पुरेसा आहे. कंगनाच्या अदा, तिची तलवारबाजी, तिचा करारी बाणा, भव्य सेट सगळेच नुसते अप्रतिम आहे. कंगनाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणतो,मेरी झांसी नहीं दुंगी हा तिचा करारी बाणा मनात स्फुलिंग पेटवतो. कंगना आणि कंगना हीच या ट्रेलरची ‘जान’ आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी अशा अनेकांची  झलक ट्रेलरमध्ये दिसते. पण खरा भाव खावून जाते ती कंगना. हा ट्रेलर भन्साळींच्या ऐतिहासिक चित्रपटांची आठवण करून देतो, शिवाय कंगनाच्याही मोहात पाडतो...एकंदर ट्रेलर पाहिल्यानंतर प्रत्येकजण कंगनाच्या पे्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. ट्रेलर तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते नक्की सांगा...

क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्सआॅफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा मुकाबला पाहायला मिळणार आहे.

Web Title: manikarnika the queen of jhansi trailer actress kangana ranaut wins the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.