Mamta Kulkarni had a condition for that topless photoshoot! People were on the road !! | त्या टॉपलेस फोटोशूटसाठी ममता कुलकर्णीने ठेवली होती एक अट! रस्त्यावर उतरले होते लोक!!

एकेकाळची बॉलिवूडची लोकप्रीय अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे अख्खे आयुष्यचं वादग्रस्त राहिले. आपल्या फिल्मी करिअरपेक्षा ती तिचे खरे आयुष्य आणि ड्रग्ज प्रकरणानेचं अधिक चर्चेत राहिली. करिअरच्या सुरूवातीलाच एका निर्णयाने ममताने वाद ओढवून घेतला आणि पुढे ‘वादग्रस्त’ हा शब्द जणू विशेषण म्हणून तिच्या नावापुढे चिटकला. त्यादिवसांत ममताने घेतलेल्या त्या वादग्रस्त निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. ममताला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या़ ही घटना ममता इंडस्ट्रीत अगदी नवखी असतानाची आहे. ममताला इंडस्ट्रीत कुणीही ओळखत नव्हते. याचदरम्यान स्टारडस्ट मॅगझिनला एक कव्हर शूट करायचे होते आणि त्यांना यासाठी एका नव्या चेह-याचा शोध होता. अनेक बड्या हिरोईन्सनी नकार दिल्यानंतर कुणीतरी या कव्हरशूटसाठी ममताचे नाव सुचवले. ममतासाठी ही मोठी संधी होती. मग काय, प्रस्ताव मिळताच तिने होकार दिला. पण फोटोशूट टॉपलेस असणार, हे ममताला कळले आणि तिच्या पायाखालची वाळू सरकली. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा हे फोटोशूट करणारा फोटोग्राफर जयेश सेठ याने एका मुलाखतीत केला होता.त्याने सांगितले होते की, टॉपलेस फोटोशूटची गोष्ट ऐकली आणि ममता जागेवरून उडालीच. यात खूप रिस्क आहे. हे चालले तर ठीक आहे. पण चालले नाहीचं तर माझ्या घरचेचं नाही तर इंडस्ट्रीतले लोक मला बाहेर फेकून देतील. मला विचार करू देत, असे ती म्हणाली. काही वेळ विचार केल्यानंतर ममता या फोटोशूटसाठी तयार झाली. पण याचवेळी तिने एक अटही ठेवली. मला मला स्वत:ला फोटो आवडले तर ते छापले जातील, असे ती म्हणाली. मेकर्सने तिची ती अट मानली आणि ममताने जोरदार टॉपलेस पोज दिल्यात.  तिचे हे टॉपलेस फोटो बाजारातही आलेत. स्टारडस्टच्या मॅगझिनवर लोकांच्या उड्या पडल्यात. अनेक मॅगझिनचे अंक ब्लॅकमध्ये विकल्या गेलेत. या फोटोशूटने ममताला मोठी लोकप्रीयता दिली. ती एका रात्रीत प्रकाशझोतात आली. पण अनेकांना ममताचे हे बोल्ड रूप पचले आहेत. लोक तिच्याविरोधात रस्त्यावर उतरलेत. याकाळात तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्यात. अर्थात या सगळ्यांमुळे ममताच्या करिअरचे नुकसान होण्याऐवजी तिचा फायदाचं झाला.

ALSO READ : ड्रग्ज, अंडरवर्ल्ड अ‍ॅण्ड बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस

आमिर खानपासून सलमान खान व अनेक मोठ्या स्टार्सनी तिच्या या बोल्ड निर्णयाची प्रशंसाचं केली. यानंतर ममताच्या घरासमोर निर्मात्या दिग्दर्शकांची रांग लागली. पुढे ममता बॉलिवूडमध्ये आली आणि तिने काही काळ मोठा पडदा गाजवला. अर्थात पुढे ‘स्टारडम’ने दिलेले हे स्टारडम टिकवणे ममताला जमले नाही. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव आले आणि यशाच्या शिखरावरून ती एका झटक्यात जमिनीवर आपटली. पुढची सगळी स्टोरी तुम्हाला माहित आहेच.
Web Title: Mamta Kulkarni had a condition for that topless photoshoot! People were on the road !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.