PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:51 AM2019-01-29T10:51:29+5:302019-01-29T10:56:02+5:30

प्रियांका चोप्रा व निक जोनास गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियांका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. आता प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली.

Mama and Papa Jonas hosted a celebration in the honour of Priyanka chopra and Nick jonas | PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले.

प्रियांका चोप्रा व निक जोनास गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियांका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. आता प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली. या वेलकम पार्टीचे फोटो व व्हिडिओ सध्या इंटरेटवर धूम करत आहेत.


प्रियांकाने या पार्टीचा एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. जॅम धन्यवाद, रिसेप्शनसाठी आभार, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. या फोटोत प्रियांका व निकसोबत प्रियांकाची आई मधू चोप्रा, सासू सासरे केविन जोनास व डेनिस जोनास दिसत आहेत. या रिसेप्शनच्या व्हिडिओत प्रियांकाचा अंदाज पाहण्यासारखा आहे. निकसोबत ती अतिशय आनंदी दिसत आहे. प्रियांकाच्या या रिसेप्शनचे व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि कसे वाटलेत, ते नक्की कळवा.


लग्नानंतर प्रियांका व निक दोघेही स्वित्झर्लंड व कॅरेबियन देशात हनीमूलला गेले होते. यादरम्यानचे अनेक फोटो प्रियांकाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले होते. प्रियांकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटातून तू बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. या चित्रपटात ती फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. जायमा वसीमही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाचे काही शूटींग शिल्लक आहे. या शूटींगसाठी प्रियांका लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. गत १ डिसेंबरला दोघेही ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुस-या दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांका व निकच्या लग्नाचा एकही फोटो लीक झाला नाही. कारण या लग्नाच्या फोटोचे हक्क एका मॅगझिनला विकण्यात आले होते.

 

Web Title: Mama and Papa Jonas hosted a celebration in the honour of Priyanka chopra and Nick jonas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.