मल्लिका शेरावत करणार ही नवी गोष्ट, ऐकून व्हाल खुश!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 06:36 PM2019-01-30T18:36:12+5:302019-01-30T18:37:05+5:30

मल्लिका शेरावतला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आता फार वाट पाहण्याची गरज नाही. मर्डर, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट आणि अशा अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमातून असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही डॅझलिंग दिवा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे.

Mallika Sherawat will be doing this new thing! | मल्लिका शेरावत करणार ही नवी गोष्ट, ऐकून व्हाल खुश!

मल्लिका शेरावत करणार ही नवी गोष्ट, ऐकून व्हाल खुश!

googlenewsNext
ठळक मुद्देमल्लिकाचे डिजिटल माध्यमात पदार्पणमल्लिका साकारणार मजेशीर भूताची भूमिका


मल्लिका शेरावतला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आता फार वाट पाहण्याची गरज नाही. मर्डर, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट आणि अशा अनेक ब्लॉकब्लस्टर सिनेमातून असंख्य चाहत्यांना घायाळ करणारी ही डॅझलिंग दिवा पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. बू- सबकी फटेगी या ऑल्ट बालाजीच्या आगामी हॉरर कॉमेडीमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मल्लिकासोबत तुषार कपूर आणि कृष्णा अभिषेकही या सिरीजमधून डिजिटल मनोरंजनात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे मल्लिकाने आजवर साकारलेल्या भूमिकांहून आताची भूमिका अगदी वेगळी असणार आहे. या सीरिजमध्ये ती एक मजेशीर भूत असणार आहे. अर्थात, मल्लिका आहे म्हणजे घाबरण्याचे काही कारणच नाही.
डिजिटल मनोरंजनातील प्रवेशाबद्दल मल्लिका म्हणाली, भारतात परत येण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. शिवाय, आता मी बू- सबकी फटेगी या सीरिजमधून पदार्पणही करते आहे. ऑल्ट बालाजी हे भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक लोकप्रिय ओटीटी व्यासपीठ आहे. त्यामुळे, डिजिटल क्षेत्रात प्रवेशासाठी यापेक्षा
अधिक चांगली संधी कोणती असेल. या हॉरर कॉमेडीमध्ये मी भूताची भूमिका साकारणार आहे. या शोमधील माझा लूक फारच वेगळा आहे. आता मी भारतात येऊन शुटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे. प्रेक्षकांसाठी या शोमध्ये काय असेल, याची थोडी प्रतिक्षा करा. या हॉरर कॉमेडीमध्ये थोड्याशा भीतीसोबतच तुम्ही भरपूर हसणार आहात.
२०१७मध्ये मल्लिका शेवटची पडद्यावर दिसली होती. दोन वर्षांच्या या ब्रेकनंतर तिला पाहणे ही चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.

Web Title: Mallika Sherawat will be doing this new thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.