Mallika Sherawat to fans, good news! Surprising will soon be given to the audience | मल्लिका शेरावतची चाहत्यांसाठी Good News...! लवकरच प्रेक्षकांना देणार हे सरप्राईज
मल्लिका शेरावतची चाहत्यांसाठी Good News...! लवकरच प्रेक्षकांना देणार हे सरप्राईज

ठळक मुद्देमल्लिका झळकणार वेबसीरिजमध्ये

मर्डर फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यावर झळकताना दिसली नाही. मात्र आता ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळेस ती रुपेरी पडद्यावर नाही तर वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. मल्लिकाने नुकतेच वेबसीरिजच्या शूटिंगचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि ती आपल्या चाहत्यांना याबाबत अपडेट देते आहे.

मल्लिका शेरावत तुषार कपूरसोबत वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज असणार असून वेगळ्या अंदाजात मल्लिका दिसणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन गोलमाल सीरिजचे लेखक फरहाद सामजी करणार आहेत. या वेबसीरिजची कथा काही मित्रांभोवती आधारीत असून ते एका रिकाम्या रिसॉर्टमध्ये जातात. तिथे अशा काही घटना घडतात. ज्यामुळे त्यांचा थरकाप उडतो. या सीरिजमध्ये मल्लिका भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. तिला या अंदाजात पाहणे कमालीचे ठरणार आहे. 


मल्लिकाने २००३ साली ख्वाहिश चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा २००४ साली प्रदर्शित झालेल्या मर्डर सिनेमातून ती लोकप्रिय झाली. मर्डर चित्रपट हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा अनफेदफुलचा हिंदी रिमेक आहे.

२००५मध्ये मल्लिकाने जॅकी चॅनसोबत द मिथमध्ये काम केले . त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला गुरू चित्रपटातील मैया मैया गाण्यातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर वेलकम चित्रपटात ती दिसली. आता तिला वेगळ्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

English summary :
Mallika has just shared web series shooting photos on Instagram and she gives updates to her fans about it. Mallika Sherawat will be seen in WebSeries with Tushar Kapoor. It will be a horror comedy.


Web Title: Mallika Sherawat to fans, good news! Surprising will soon be given to the audience
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.