लोकप्रीय मल्याळम अभिनेत्री भावना मेनन आज सोमवारी लग्नबंधनात अडकली. दिग्दर्शक नवीन कृष्णनसोबत तिने लग्नगाठ बांधली. त्रिशूरच्या थिरूवामबदी मंदिरात भावना व नवीन यांचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडला. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोत भावनाने गोल्डन रंगाची सिल्कची साडी नेसली आहे. सोबत टेंपल डिझाईनची ज्वेलरी, माथा पट्टी मॅच केली आहे. वधूच्या वेषात भावना कमालीची सुंदर दिसतेय.


लग्नाआधीचे मेहंदी सेरेमनीचे भावनाचे काही फोटोही बघण्यासारखे आहेत. यात भावना मैत्रिणींच्या गोतावळ्यात बसलेली दिसतेय. या फंक्शनमध्ये भावनाने पिवळ्या रंगाचा गाऊन घातलेला आहे.
भावनाचे हे लग्न अतिशय खासगी ठेवले गेले. अतिशय जवळचे मित्र आणि कुटुंबीय केवळ इतक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. भावना व नवीन यांची भेट २०१२ मध्ये पीसी शंकर यांच्या ‘रोमियो’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच सेटवर भावना व नवीन एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर गतवर्षी मार्चमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता आणि  आज दोघेही लग्नबंधनात अडकले.अभिनेत्री भावनाला बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने खास अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. तिने व्हिडिओ मॅसेजद्वारे भावनाचे अभिनंदन केले. भावना मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. भावनाचे खरे नाव कार्तिका मेनन आहे. पण ती भावना या नावानेच ओळखली जाते. २००२ मध्ये ‘नम्मल’ या मल्याळम चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आणि नंतर इथलीच झाली. तिचा पती नवीन हा दिग्दर्शक व निर्माता आहे. निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात येण्यापूर्वी नवीन अभिनेता म्हणून ओळखला जायचा. २०१० मध्ये आलेल्या ‘नायक’ या कन्नड चित्रपटात तो लीड रोलमध्ये दिसला होता.
Web Title: Malayalam actress Mahesh Menon gets stuck in a wedding, see photos from turmeric to satyapati!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.