अभिनेता तथा निर्माता अरबाज खान याची पूर्व पत्नी मलाइका अरोरा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच मलाइकाने तिचे काही समर व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये स्विमिंग करताना दिसत आहे. आतापर्यंत तिच्या या फोटोंना १.१५ लाख लोकांनी लाइक केले असून, हजारोंच्या संख्येने त्यास कॉमेण्ट दिल्या जात आहेत. मात्र मलाइकाचा हा अवतार बघून काही यूजर्स नेहमीसारखेच नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता मलाइकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 
 

तुलिका नावाच्या एका यूजरने लिहिले की, एक आई बिकिनीमधील तिचे असे फोटो कसे काय पोस्ट करू शकते?, फैजल नावाच्या अन्य एका यूजरने लिहिले की, ‘थोडी तर लाज बाळग, मुलगा काय विचार करणार?’ यूजर्सच्या या संतापजनक कॉमेण्टवर मलाइकाने मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची रिअ‍ॅक्शन दिली नाही. या अगोदर जानेवारी २०१८ मध्ये मलाइकाने शेअर केलेल्या गोल्डन गाउनमधील फोटोमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. त्यावेळी एका यूजरनी लिहिले होते की, ‘या वयात न्यूडिटी दाखविण्यासाठीच तू नवºयापासून विभक्त झालीस काय?’ वास्तविक मलाइका या अगोदरही बºयाचदा तिच्या बोल्ड ड्रेसमुळे यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

आॅगस्ट २०१७ मध्ये मलाइका ट्रोलिंगला बळी पडली होती. एका यूजर्सनी तिच्या शॉर्ट कपड्यांवर आपत्ती दर्शविताना म्हटले होते की, ‘हल्ली मलाइकाचे आयुष्य छोटे-छोटे कपडे घालण्यात, जिम, सलून किंवा व्हेकेशन एन्जॉय करण्यापर्यंतच मर्यादित राहिली आहे. खरच तुझ्याकडे करण्यासाठी काहीच काम नाही काय? की तू केवळ पतीच्या पैशांवर मौज करीत आहे. 
Web Title: Malaika Arora shares photos in swimsuit; The user said, 'What are you doing at this age?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.