मलायका अरोरा झाली पुन्हा एकदा ट्रोल, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हाला आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 04:58 PM2019-05-16T16:58:13+5:302019-05-16T16:58:33+5:30

मलायका अरोरा वर्कआऊटच्या व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे.

Malaika Arora Once again, you will not be able to read the trolls, news stories | मलायका अरोरा झाली पुन्हा एकदा ट्रोल, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हाला आवरणार नाही हसू

मलायका अरोरा झाली पुन्हा एकदा ट्रोल, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून तुम्हाला आवरणार नाही हसू

अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. तिचे अर्जुन कपूरसोबत अफेयर असल्याची सगळीकडे चर्चा आहे. याशिवाय बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळेदेखील बऱ्याचदा ती ट्रोल होते. ती पुन्हा एकदा ट्रोल झाली असून यावेळेस ती वर्कआऊटच्या व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे.  

अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस क्रेझी आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. कधी कधी ती योगा करताना दिसते तर कधी जिममध्ये घाम गाळताना दिसते. ती नेहमीच आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता मलायकाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका पुन्हा एकदा जबरदस्त वर्कआऊट करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सही पहायला मिळत आहेत. 


मलायकाचा हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स तिला 'फायर' म्हणून संबोधत आहेत. या व्हिडिओमध्ये मलायका एक प्रॉपचा वापर करताना दिसते आहे. प्रॉपच्या आधारे मलायका अरोरा बॉडीला मूव्ह करत एक बॅक फ्लिप मारताना दिसते आहे. हे वर्कआऊट मलायका खूप सहज करताना दिसते आहे.


मलायकाचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते खूप स्तुती करताना दिसत आहे. अनेक जण तिच्या व्हिडिओमुळे प्रेरणा घेताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे काही सोशल मीडिया यूजर्स मलायका अरोराला ट्रोल करताना दिसत आहेत.

एका यूजरने तर कमेंट केली की, ‘जास्त उड्या मारू नको, म्हातारपणी एखादे हाड इकडे-तिकडे झाले तर खूप त्रास होईल.

तर एका यूजरने मलायकाला ट्रोल करत, हा स्टंट पाहून हिला आता पुढील वर्षी ऑलिपिंक स्पर्धेत पाठवावे लागेल, अशीही कमेंट केली. 

Web Title: Malaika Arora Once again, you will not be able to read the trolls, news stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.