आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 06:00 AM2019-05-04T06:00:00+5:302019-05-04T06:00:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियांवरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मलायकाचा फोटो वा व्हिडीओ व्हायरल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

malaika arora old fan and click picture after yoga session | आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!

आजीबाई अडल्या; ‘हॉट’ मलायका अरोरासोबत ‘फोटू’ काढून थांबल्या!!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांपेक्षा सोशल मीडियांवरच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. मलायकाचा फोटो वा व्हिडीओ व्हायरल होत नाही, असा एकही दिवस जात नाही. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक वृद्ध महिला दिसतेय.
जिममधून बाहेर आल्यावर आपल्या गाडीची प्रतीक्षा करत असताना एक वृद्ध महिला मलायकाच्या जवळ येते आणि तिला फोटोसाठी विचारते. मलायका आधी या वृद्ध महिलेसोबत फोटो काढताना कचरते. तिच्याकडे काहीसे दुर्लक्ष करते. पण नंतर वृद्ध महिला फोटोसाठी अडून बसली म्हटल्यावर तिच्यासोबत फोटो काढायला तयार होते.


आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी मलायका योगा आणि जिमला सर्वाधिक वेळ देते. तिचे ड्रेसिंग स्टाईलही हटके आहेत. साहजिकच तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मलायकाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. वृद्ध महिलेसोबत फोटो काढल्याबद्दल काही जण मलायकाचे कौतुक करताहेत. तर आधी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल काही जण मलायकाला ट्रोल करताहेत.
गेल्या काही दिवसांपासून मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अलीकडे मलायका व अर्जुन अगदी बिनधास्त, जगाची पर्वा न करता हिंडता फिरताना दिसतात. लवकरच हे कपल लग्न करणार असेही मानले जात आहे. अर्थात लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे मलायकाचे म्हणणे आहे.

Web Title: malaika arora old fan and click picture after yoga session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.