Malaika Arora and Shruti Hassan get 'atomic blond' award! | मलायका अरोरा अन् श्रुती हासनला मिळाला ‘एटॉमिक ब्लोंड’ अ‍ॅवॉर्ड!

अभिनेत्री श्रुती हासन आणि आयटम गर्ल मलायका अरोरा यांना अनुक्रमे एटॉमिक रॉकस्टार आणि एटॉमिक बॉम्बशेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीव्हीआर पिक्चर्सच्या एटॉमिक पुरस्कारांतर्गत देण्यात आला. याविषयी श्रुतीने म्हटले की, ‘मी या आगळ्यावेगळ्या एटॉमिक रॉक स्टार पुरस्कारासाठी ‘एटॉमिक ब्लोंड’च्या टीमची आभारी आहे. मी या पुरस्कारामुळे खूपच आनंदी असून, मला हा पुरस्कार महानतेची आठवण करून देत आहे. 

तर मलायकाने म्हटले की, मी एटॉमिक ब्लोंड आणि पीव्हीआर टीमचे या शानदार, कूल आणि सेक्सी पुरस्कारासाठी मनापासून आभार मानते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूपच सुखद आश्चर्य वाटत आहे. वास्तविक हा पुरस्कार हॉलिवूडच्या चार्लीज थेरॉनसारख्या प्रभावशाली महिलेला देण्यात आला आहे. आता या यादीत मलाही स्थान मिळाल्यामुळे मी हरखून गेले आहे. अशा प्रभावशाली महिलेच्या यादीत स्थान मिळविणे नक्कीच गौरवास्पद असल्याचेही मलायकाने म्हटले आहे. पुढे बोलताना मलायकाने म्हटले की, ‘मी अल्ट्रा कूल चार्लीज थेरॉन हिची मोठी चाहती आहे. त्यामुळे मी सर्व सेक्सी आणि कूल महिलांना सांगू इच्छिते की, हा एक असा चित्रपट आहे की, जो सर्वांनी बघायला हवा. 

‘एटॉमिक ब्लोंड’ शुक्रवारी देशातील सर्व पीव्हीआर पिक्चर्सच्या वतीने रिलीज केला जाणार आहे. दरम्यान या आगळ्यावेगळ्या पुरस्कारामुळे श्रुती आणि मलायका चांगल्याच खुश असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेतल्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोट होऊनदेखील अरबाज आणि मलायका एकत्र दिसत असल्याने त्यांच्याविषयी चर्चा रंगत आहेत. तर श्रुती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. 
Web Title: Malaika Arora and Shruti Hassan get 'atomic blond' award!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.