malaika arora and arbaaz khans son arhaan is entering bollywood | ठरला अरबाज खान व मलायका अरोराच्या मुलाचा डेब्यू!
ठरला अरबाज खान व मलायका अरोराच्या मुलाचा डेब्यू!

ठळक मुद्देअरबाज व मलायकाबद्दल सांगायचे तर, घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडलीय. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रमलाय.

अरबाज खानमलायका अरोरा भलेही कायद्याने पती-पत्नी राहिलेले नाहीत. पण अद्यापही अरबाज व मलायका बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे. तो म्हणजे, त्यांचा मुलगा अरहान. मलायका व अरबाजने घटस्फोट घेतला. पण यानंतरही अनेकदा हे दोघेही अरहानसोबत दिसलेत. सध्या अरहानमुळे अरबाज व मलायका जाम आनंदात आहेत आणि या आनंदाचे कारण म्हणजे, अरहानचा बॉलिवूड डेब्यू. होय, अरहान बॉलिवूड डेब्यू करतोय.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’मध्ये अरहान दिग्दर्शक प्रभुदेवाला असिस्ट करणार आहे. म्हणजे अरहान सहायक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतोय. साहजिक अरबाज व मलायका जाम खूश आहेत.

येत्या एप्रिलपासून ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होतेय.२०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गतवर्षी ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.  याच चित्रपटातून अरहानचा डेब्यू होतोय. आता चाचू सलमानचा हा चित्रपट अरहानला इंडस्ट्रीत किती आणि कसे अनुभव देतो, ते बघूच.
अरबाज व मलायकाबद्दल सांगायचे तर, घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडलीय. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रमलाय. मलायका लवकरच अर्जुनसोबत लग्न करणार, अशी चर्चा आहे. अरबाज व जॉर्जियाही याच वळणावर आहेत.
 

English summary :
Arhaan is stepping into Bollywood as assistant director. Arbaaz and Malaika are happy. 'Dabang 3' shooting starts from next April. In 2010, 'Dabangg' was released. Then in 2012, Dabang 2 hit the box office.


Web Title: malaika arora and arbaaz khans son arhaan is entering bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.