महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 06:00 AM2018-11-22T06:00:00+5:302018-11-22T06:00:00+5:30

महेश भट यांनी 'सडक' चित्रपटाच्या सीक्वलच्या तयारीला सुरूवात केली आहे.

Mahesh Bhat has collaborated with Fox Star Studios, that's because the reason | महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

महेश भट यांनी फॉक्स स्टार स्टुडिओजसोबत केली हातमिळवणी, हे आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्दे महेश भट यांनी 'सडक २'च्या तयारीला केली सुरूवात 'सडक २' चे चित्रीकरण होणार उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये

१९९१ साली 'सडक' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश भट यांनी आपल्या ७०व्या वाढदिवसादिवशी 'सडक २' सिनेमाची घोषणा केली होती.


 महेश भट यांनी 'सडक २'च्या तयारीला सुरूवात केली आहे. या चित्रपटासाठी त्यांनी फॉक्स स्टार स्टुडिओसोबत हातमिळवणी केली असल्याचे समजते आहे. याबाबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, इट्स ऑफिशिएल... फॉक्स स्टार स्टुडिओ व विशेष फिल्म्स मिळून महेेश भट दिग्दर्शित 'सडक २' शिवाय आणखीन तीन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. 'सडक २'मध्ये संजय दत्त, पूजा भट, आदित्य रॉय कपूर व आलिया भट हे कलाकार दिसणार आहेत.
भट कॅम्पनुसार, 'सडक २' चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये होणार आहे. काही दिवसांपूर्वी पूजा भटने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत पूजा भटसोबत महेश भट दिसत आहेत. तिने फोटोसह लिहिले की, 'सडक २'च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. यासंदर्भात महेश भटने उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांची भेट घेतली होती. 
१९९१ मध्ये 'सडक' हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत 'सडक२'मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे.

Web Title: Mahesh Bhat has collaborated with Fox Star Studios, that's because the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.