Mahesh Babu's 'India Anne Nanu' is heavily burdened on 'Padmavat'; 100 crores of gala in two days !! | ​‘पद्मावत’वर भारी पडतोय महेशबाबूचा ‘भारत एने नेनू’; दोनचं दिवसांत कमावला १०० कोटींचा गल्ला!!

तेलगू सुपरस्टार महेश बाबूचा ‘भारत एने नेनू’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवर घोडदौड सुरू आहे. दोनचं दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या तीन राज्यांत या चित्रपटाने धूम केली आहे. केवळ भारतातचं नाही तर अन्य देशांतही या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. आॅस्ट्रेलियात ‘पद्मावत’नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून एक नवा विक्रम ‘भारत एने नेनू’च्या नावावर जमा झाला आहे. आॅस्ट्रेलियात ‘पद्मावत’ तामिळ, तेलगू व हिंदी अशा तीन भाषांत रिलीज झाला होता. याऊलट ‘भारत एने नेनू’  केवळ तेलगू या एकाच भाषेत रिलीज झालायं. यावरून ‘भारत एने नेनू’  रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावत’वरही भारी पडल्याचे चित्र आहे.भारतात रिलीजच्या दोनचं दिवसांत हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झालाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटात जगभरात ५३ कोटींचा बिझनेस केला. चेन्नई बॉक्सआॅफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपटाचा विक्रमही ‘भारत एने नेनू’ च्या खात्यावर जमा झाला आहे. हा चित्रपट तसा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. या चित्रपटाच्या टीजरलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील सर्वाधिक ‘लाईक्स’ मिळवणाºया टीजरच्या यादीत ‘भारत एने नेनू’ दुसºया क्रमांकावर होता. 
 दिग्दर्शक कोरटला शिवा यांनी ‘भारत एने नेनू’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कोरटला शिवा यांच्यासोबतचा महेशबाबूचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ‘श्रीमंथुडू’ या चित्रपटासाठी ही जोडी एकत्र आली होती. हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला होता.  राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून कियाराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

ALSO READ : नम्रता शिरोडकरच्या आयुष्यातील ‘महेश’ची इंटरेस्टिंग स्टोरी! तुम्हीही वाचा!!
Web Title: Mahesh Babu's 'India Anne Nanu' is heavily burdened on 'Padmavat'; 100 crores of gala in two days !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.