WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:26 PM2019-02-13T15:26:36+5:302019-02-13T15:27:51+5:30

जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय.

Mahesh Babu is the first Indian celebrity to have his wax statue migrated to India for a day | WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!

WOW! एका दिवसासाठी भारतात येणार महेश बाबूचा मादाम तुसादमधील मेणाचा पुतळा!!

googlenewsNext
ठळक मुद्देहैदराबादेतील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात येईल. महेशबाबूचे चाहते या पुतळ्याला ‘याची देही याची डोळा’ पाहू शकतील. 

जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येतोय. होय,   मादाम तुसाद संग्रहालयाची शोभा वाढवणारा महेश बाबूचा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी हैदराबादेत आणला जाणार आहे. हैदराबादेतील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात येईल. महेशबाबूचे चाहते या पुतळ्याला ‘याची देही याची डोळा’ पाहू शकतील. 


यापूर्वी कुठल्याही भारतीय सेलिब्रिटीचा अशाप्रकारे भारतात आणला गेलेला नाही. केवळ चाहत्यांच्या आग्रहाखातर पहिल्यांदा मादाम तुसादमधील महेशबाबूचा मेणाचा पुतळा त्याच्या कर्मभूमीत येणार आहे. यानंतर तो मादाम तुसादच्या मलेशिया येथील संग्रहालयात विराजमान होईल. 


१९७९ मध्ये महेश बाबूने तेलगु ‘नींदा’ या सिनेमाच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिग्दर्शक नारायम राव यांनी छोट्या महेशसोबत काही सीन शूट केले होते. या सिनेमातील त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. त्यानंतर त्याने शंखाखम, बाजार राऊडी, मुगुरु कोडुकुलू आणि नगदाचारी यासारख्या सिनेमात काम केलं. 
बालकलाकार म्हणून महेश बाबूने ९ सिनेमात काम केलं. पण वडिलांच्या सांगण्यावरुन महेश बाबू सिनेमापासून ९ वर्ष दूर राहिला. चित्रपटात येण्यापूर्वी महेश बाबूनं   शिक्षण पूर्ण करावं, अशी वडिलांची शिक्षा होती. या इच्छेखातर महेशबाबूने आधी शिक्षण पूर्ण केले आणि यानंतर १९९९ मध्ये ‘राजा कुमारुदु’ या सिनेमातून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. या सिनेमात   प्रिती झिंटा त्याची हिरोईन होती. 

Web Title: Mahesh Babu is the first Indian celebrity to have his wax statue migrated to India for a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.