Madhuri Dixit's first Marathi film 'Bucket List' first poster came! | ​ माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’चे पहिले पोस्टर आले!

अलीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार प्रादेशिक सिनेमांकडे वळलेत. अमिताभ बच्चन, अजय देवगण, रितेश देशमुख अशा अनेकांची नावे या क्रमात घेता येतील. आता या यादीत आणखी एक बडे नाव समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे, माधुरी दीक्षित नेने. होय, तुमच्या आमच्या ‘दिलाची धडकन’ माधुरी लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. या मराठी चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर आज रिलीज झाले. ‘बकेट लिस्ट’ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. काही क्षणांपूर्वी माधुरीने तिच्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट केले. या पोस्टरमध्ये माधुरी एका घरगुती महिलेच्या भूमिकेत दिसतेय. तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसतेय.
आपल्या या चित्रपटाबद्दल बोलताना माधुरीने सांगितले की, हा चित्रपट एका गृहिणीची कथा आहे. ही महिला तुम्हाला केवळ जगण्याची प्रेरणाच देत नाही तर आयुष्य जगण्याचा एक योग्य मार्गही दाखवते. या चित्रपटाची कथा मला प्रचंड भावली आणि म्हणूनच मी हा चित्रपट करण्यास होकार दिला. डार्क हाऊस सिनेमा आणि ब्ल्यू मस्टंग क्रिएशन्सची निर्मिती असलेला ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट तेजस प्रभा विजय देवसकर दिग्दर्शित करणार आहे. या वर्षात उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. माधुरी तिच्या या आगामी चित्रपटासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात ती पुण्यात राहाणा-या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाºया लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे सध्या ही बोलण्याची ढब शिकण्याचा माधुरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे माधुरी सध्या बाईक चालवायला शिकत आहे.  

ALSO READ : ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितला ‘त्या’ सीनचा आहे पश्चाताप!

या मराठी चित्रपटाशिवाय माधुरी दीक्षित यंदा इंदर कुमार यांच्या एका कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. ‘टोटल धमाल’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यात ती प्रमुख भूमिकेत दिसेल. यात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, बोमन इराणी आणि जावेद जाफरी असे दिग्गज कलाकारही दिसतील.
Web Title: Madhuri Dixit's first Marathi film 'Bucket List' first poster came!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.