माधुरी दीक्षित म्हणतेय, 'लेट्स डान्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 08:00 AM2018-11-05T08:00:00+5:302018-11-05T08:00:00+5:30

नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आता माधुरी दीक्षित सज्ज झाली आहे.

Madhuri Dixit says, 'Let's dance' | माधुरी दीक्षित म्हणतेय, 'लेट्स डान्स'

माधुरी दीक्षित म्हणतेय, 'लेट्स डान्स'

googlenewsNext
ठळक मुद्देमाधुरी दीक्षित देणार डान्सचे धडे


नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आता माधुरी दीक्षित सज्ज झाली आहे. लवकरच ती भारती एअरटेलच्या सहकार्याने एअरटेल टीव्हीवर 'लेट्स डान्स' नावाचे डान्स वाहिनी सुरू करणार आहे. याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, ''प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली प्रतिभा आणि अभिव्यक्ती शोधणे हाच डान्स विथ माधुरीचा दृष्टीकोन असणार आहे.''

एअरटेल डिजीटल टीव्हीच्या मदतीने लाखो लोकांना आपल्या लिव्हिंग रुममध्ये राहून नृत्याचे धडे गिरवता येणार आहेत. हे सुरु करण्यासाठी मी खूपच उत्सुक झाले आहे, असे माधुरीने सांगितले. या चॅनेलवर १५० ते १७० प्रकारचे नृत्य कोणत्याही जाहिरातीच्या अडथळ्याशिवाय शिकता येतील. यात माधुरी दीक्षितसोबत आणखीनही काही नृत्य दिग्दर्शक डान्स शिकवणार आहेत.
माधुरी दीक्षितच्या आधी असे बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खानने देखील केले आहे. माधुरी दीक्षितने 'एक दोन तीन', 'चोली के पिछे', 'चने के खेत में' आणि 'दीदी तेरा देवर दीवाना' या गाण्यावर थिरकून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे.
माधुरी दीक्षित व संजूबाबा म्हणजेच संजय दत्त २१ वर्षानंतर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. कलंक' चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आता हा चित्रपट बनत असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Madhuri Dixit says, 'Let's dance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.