Madhuri Dixit, Anil Kapoor's First Choice | ‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती अनिल कपूरची फर्स्ट च्वॉइस!

अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी ‘तेजाब’, ‘बेटा’ या चित्रपटांसह इतरही बºयाचशा चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केले. या सुपरहिट जोडीचा पहिला चित्रपट तेजाब होता. आता तुम्हीच विचार करा की, जर तेजाबमध्ये माधुरी दीक्षितऐवजी दुसरीच एखादी अभिनेत्री असती तर अनिल-माधुरी ही सुपरहिट जोडी पुढे आली असती काय? होय, हा चित्रपट माधुरीला नशिबानेच मिळाला असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अगोदर मीनाक्षी शेषाद्री हे नाव निश्चित केले होते. मात्र, अचानकच मीनाक्षीचा पत्ता कापत माधुरीला संधी देण्यात आली. 

‘अबोध’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाºया माधुरीचा हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नाही. सुरुवातीला तिला खूपच परिश्रम घ्यावे लागले. परंतु तेजाबने तिला रातोरात सुपरस्टार बनविले. या चित्रपटात माधुरी अनिल कपूरच्या अपोझिट लीड रोलमध्ये बघावयास मिळाली. चित्रपट रिलीज होताच, चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतले. चित्रपटातील माधुरीचा ‘मोहिनी’ अवतार प्रेक्षकांना खूपच भावला. चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणे तर आजही लोकांच्या ओठावर आहे. तब्बल चार फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारा हा चित्रपट आजही माधुरीसाठी खूपच स्पेशल आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, या चित्रपटासाठी सुरुवातीला मीनाक्षी शेषाद्रीला साइन करण्यात आले होते? होय, ‘मोहिनी’ या पात्रासाठी दिग्दर्शकांनी पहिली पसंती मीनाक्षीला दिली होती. तिला साइनही करण्यात आले होते. परंतु कमी मानधन आणि शूटिंगकरिता पुरेसा वेळ नसल्याने तिने या चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट माधुरीला मिळाला. कदाचित मीनाक्षीने जर चित्रपट साइन केला असता तर आज तेजाबमध्ये अनिल-मीनाक्षी ही जोडी बघावयास मिळाली असती. असो, हा सर्व नशिबाचा खेळ म्हणावा लागेल. माधुरीला या चित्रपटाने रातोरात स्टारडम मिळवून देताना बॉलिवूडची धक धक गर्ल अशी ओळखही मिळवून दिली. या चित्रपटानंतर अनिल कपूर अन् माधुरीची जणूकाही जोडीच बनली. 
Web Title: Madhuri Dixit, Anil Kapoor's First Choice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.