Madhuri Dixit and Anil Kapoor's Seasoning Chemistry will be seen again onscreen | माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची सिजलिंग केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसणार ऑनस्क्रिन

दिग्दर्शक इंदर कुमारचा चित्रपट 'टोटल धमाल'मध्ये पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग दोघांनी सुरु केले आहे. शूटिंग दरम्यानचा एक फोटोसमोर आला आहे. फोटोत माधुरी एकदम बोल्ड अंदाजात दिसते आहे. तर अनिल कपूर आपल्या डॅशिंग लूकमध्ये दिसतो आहे. फोटोला बघून अंदाज लावण्यात येतो आहे की चित्रपटात दोघांची सेंसेशनल केमिस्ट्री ऑनस्क्रिन दिसू शकते. या फोटो आपल्याला माधुरीच्या बेटा चित्रपटातील धक-धक गाण्याची आठवण करून देतो. सध्या चित्रपटाशी संबंधीत जास्त काही माहिती मिळू शकलेली नाही 

इंदर कुमारने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर एकत्र शूट करतायेत. आम्ही तिघांनी बेटा चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनिल कपूर यात अविनाश नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. माधुरी आणि अनिल कपूरच्या जोडीने आतापर्यंत खेल, बेटा, तेजाब सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहे. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. या फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘डबल धमाल’ होता. ‘टोटल धमाल’ ७ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अरशद वारसी आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, ‘धमाल’च्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तुफान कॉमेडी बघावयास मिळाली. 

ALSO READ :  अनिल कपूरला सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘या’ गोष्टीची वाटायची भीती!

लवकरच माधुरी बकेट लिस्ट या माराठी चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. या चित्रपटात ती पुण्यात राहाणा-या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाºया लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे सध्या ही बोलण्याची ढब शिकण्याचा माधुरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे माधुरी सध्या बाईक चालवायला शिकत आहे.  
Web Title: Madhuri Dixit and Anil Kapoor's Seasoning Chemistry will be seen again onscreen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.