madhur bhandarkar did not found actor from his next film | काय म्हणता, मधूर भांडारकरला मिळता मिळेना ‘हिरो’?
काय म्हणता, मधूर भांडारकरला मिळता मिळेना ‘हिरो’?

ठळक मुद्देहोय, मधूर भांडारकरचा याआधी आलेला ‘इंदू सरकार’ या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर झालेली गत बघून कुणीही ‘इन्स्पेक्टर गालिब’साठी जोखीम उचलायला तयार नाही.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधूर भांडारकर याने अलीकडे ‘तैमूर’ हे टायटल रजिस्टर केले होते. यानंतर अनेक तर्कवितर्कांना तोंड फुटले होते. मधूरचा हा चित्रपट करिना कपूरचा मुलगा तैमूर खान याच्यावर आधारित असेल की, १४ व्या शतकातील मुघल शासक तैमूर लंगची कथा यात दाखवली जाईल, यावरून ना-ना अंदाज वर्तवले गेले होते. पण आता सगळे काही स्पष्ट झाले आहे. होय, मधूरने ‘तैमूर’ हे टायटल रजिस्टर केले असले तरी त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे, ‘इन्स्पेक्टर गालिब’. होय,  ‘इन्स्पेक्टर गालिब’ या आपल्या आगामी चित्रपटात मधूर वाळू माफियाची कथा दाखवणार आहे. मधूरचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचेही कळतेय. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासाठी मधूर गत ७-८ महिन्यांपासून वाळू माफियांवर रिसर्च करतोय. या चित्रपटाचे जवळपास संपूर्ण शूटींग उत्तर प्रदेशात होणार असल्याचेही समजेय.
आता या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. पण तूर्तास तरी मधूरला या चित्रपटासाठी हिरो मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे, कुठलाही मोठा स्टार या चित्रपटात काम करण्यासाठी तयार नाही. होय, मधूर भांडारकरचा याआधी आलेला ‘इंदू सरकार’ या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर झालेली गत बघून कुणीही ‘इन्स्पेक्टर गालिब’साठी जोखीम उचलायला तयार नाही. आणीबाणीची पार्श्वभूमी असलेला मधूरचा ‘इंदू सरकार’ प्रचंड वादग्रस्त ठरला होता. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. याच फ्लॉपचे परिणाम मधूरला सध्या भोगावे लागताहेत. बॉलिवूड इंडस्ट्री उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी इंडस्ट्री आहे, याचा प्रत्यय त्याला येतोय. अर्थात मधूर या एका गोष्टीने हार मानणारा नाही, हे आहेच.


Web Title: madhur bhandarkar did not found actor from his next film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.