Madhu Dikshit fans good news .... Madhuri will be seen in Marathi film | ​माधुरी दिक्षितच्या फॅन्ससाठी खुशखबर.... माधुरी झळकणार या मराठी चित्रपटात

माधुरी दिक्षितने तिच्या अभिनयाने, अदांनी, दिलखेच नृत्याने गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये राज्य केले आहे. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. माधुरी दिक्षित ही महाराष्ट्रीयन असल्याने ही मराठी मुलगी प्रेक्षकांना मराठी चित्रपटात कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना लागली आहे. माधुरीला अनेक वेळा मुलाखतीत याबाबत विचारण्यात देखील आले आहे. एखादी चांगली कथा असेल तर मराठीत काम करायला आवडेल असे तिने अनेकवेळा सांगितले आहे. आता माधुरी एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 
माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची कथा खूपच चांगली आणि हटके आहे. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असून माधुरी एका कणखर पण त्याचसोबत खट्याळ स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवसकर करणार असून ही कथा देखील त्यांनी आणि धनश्री शिवडेकर यांनी मिळून लिहिली आहे. 
कलेला कोणत्याही भाषेचे बंधन नसते असे मानणारी माधुरी आहे. मराठी चित्रपटात काम करण्यासाठी माधुरी प्रचंड उत्सुक आहे. तिच्या या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, प्रत्येक घरात घडणारी गोष्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा तुम्हाला केवळ आशा देणार नाही तर या कथेतून तुम्हाला एक प्रेरणा देखील मिळणार आहे. आयुष्य खऱ्या अर्थाने कसे जगायचे हे हा चित्रपट प्रेक्षकांना शिकवणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या खूप वेगळे आणि चांगले विषय आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपट करण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी गेल्या काही वर्षांत अनेक पटकथा देखील वाचल्या आहेत. पण कोणतीच पटकथा मला तितकीशा भावत नव्हती. पण ही पटकथा वाचल्यावर काहीच क्षणात मला हा चित्रपट करायचाच आहे हा निर्णय मी घेतला. या चित्रपटाची टीम खूपच चांगली आहे. 
या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम सध्या सुरू असून या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू होणार आहे. 

Also Read : ​‘तेजाब’मध्ये माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती अनिल कपूरची फर्स्ट च्वॉइस!
Web Title: Madhu Dikshit fans good news .... Madhuri will be seen in Marathi film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.