Lucar said Rani Mukherjee to her husband Aditya Chopda; But why? Learn! | पती आदित्य चोपडाला राणी मुखर्जीने म्हटले लूजर; पण का? जाणून घ्या!

बॉलिवूडची मर्दानी राणी मुखर्जी हिचा लवकरच ‘हिचकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लग्न आणि प्रेग्नेंसीनंतर राणी मुखर्जी ‘हिचकी’मधून कमबॅक करीत आहे. सध्या राणी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्यासाठी ती विविध शो आणि इव्हेंटमध्ये बघावयास मिळत आहे. नुकतेच तिने पती आदित्य चोपडा आणि तिच्या चित्रपटाबद्दल एक वक्तव्य केले. त्यामध्ये तिने पती आदित्यला ‘लूजर’ असे म्हटले. 

राणीला आदित्य चोपडाच्या चित्रपटांमध्ये काम करण्यावरून विचारले असता, तिने म्हटले की, ‘हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. मला माहीत नाही की, ते माझ्यासोबत चित्रपट का बनवित नाहीत. मी नेहमीच त्यांना याबाबत तगादा लावत असते, परंतु तो त्यांचा निर्णय आहे. मी त्यात काहीच करू शकत नाही. राणीने म्हटले की, मी घरी आदित्यबरोबर यासर्व विषयांवर चर्चा करीत असते. शिवाय मी त्यांना नेहमीच म्हणत असते की तुम्ही सर्वांत जास्त लूजर (हसत) आहात. कारण तुम्ही मला तुमच्या चित्रपटात घेत नाहीत. ते त्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत, जे चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसारच अभिनेत्रींची निवड करीत असतात. 

दरम्यान, राणीचा ‘हिचकी’ हा चित्रपट अगोदर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट २३ मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. ‘हिचकी’मध्ये राणी नैना माथूर नावाच्या एका शिक्षकेची भूमिका साकारत आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट राणीचे पती आदित्य चोपडा यांना प्रोड्युस केला आहे. 
Web Title: Lucar said Rani Mukherjee to her husband Aditya Chopda; But why? Learn!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.