loveyatri actor aayush sharma all set to sign an action packed film with salman khan films | ‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!!
‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!!

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. आयुषचे लॉन्चिंग ग्रॅण्ड व्हावे, यासाठी अख्खे खान कुटुंब झटले.खुद्द सलमानने आयुषच्या लॉन्चिंगचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतला. पण दुदैवाने आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात यामुळे आयुष जराही निराश झालेला नाही. याऊलट ‘लवयात्री’नंतर जबरदस्त कमबॅकची तयारी त्याने चालवली आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, आयुष शर्मा लवकरच सलमानच्याच बॅनरखाली एका अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपटातून बॉक्सआॅफिसवर वापसी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने ‘लवयात्री’ पाहिला आणि यातील आयुषचा अभिनय त्याला भावला. सलमानच्या मते, आयुषचा स्क्रिन प्रेजेंस चांगला आहे. त्यामुळे आयुषला पुन्हा एकदा आपल्याच होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून नवी संधी देण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. तूर्तास आयुष व सलमान दोघेही एका स्क्रिप्टवर चर्चा करत आहे. आयुषचा पहिला चित्रपट रोमॅन्टिक होता. पण यावेळी तो अ‍ॅक्शन चित्रपट घेऊन येईल.
सूत्रांचे मानाल तर, आयुषही सलमानप्रमाणे प्रेक्षकांना एक एंटरटेनिंग फिल्म देऊ इच्छितो. अनेक छोट्या-छोट्या शहरांतील प्रेक्षकांना आवडेल असा मसाला चित्रपट घेऊन येण्याचा त्याचा इरादा आहे आणि नव्या स्क्रिप्टमध्ये त्याला हवा असलेला सर्व मसाला आहे. आता हा मसाला चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो, ते बघूच. तूर्तास आयुषच्या या नव्या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. त्याची अधिकृत घोषणाही झालेली नाही. लवकरचं ती होईल, अशी आशा करूया.
आयुष शर्मा हा सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. 2014 मध्ये अर्पिता व आयुषचे लग्न झाले होते. दोघांनाही २ वर्षांचा एक मुलगा आहे.


Web Title: loveyatri actor aayush sharma all set to sign an action packed film with salman khan films
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.