Love is in the Air : सोनम - आनंदने उघडपणे केला रोमान्स, पाहा Viral फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:53 PM2018-09-26T16:53:25+5:302018-09-26T16:57:19+5:30

कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. मात्र आता प्यार किया तो डरना क्या म्हणत ते करतायत खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम.

Love Is The Air: Sonam Kapoor-Anand Ahuja share passionate kiss in Italy | Love is in the Air : सोनम - आनंदने उघडपणे केला रोमान्स, पाहा Viral फोटो

Love is in the Air : सोनम - आनंदने उघडपणे केला रोमान्स, पाहा Viral फोटो

googlenewsNext

बॉलीवूडचे हॉट कपल देतायत जणू आपल्या प्रेमाची उघड कबूली आणि प्रेम करतायत खुल्लम खुल्ला. सा-या जगापासून दूर आणि कोणालाही जराही कुणकुण लागू न देता गुपचुप गुपचुप दोन दिल आले एकत्र. त्याची कुठेही चर्चा होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली. मात्र आता प्यार किया तो डरना क्या म्हणत ते करतायत खुल्लम खुल्लम खुल्ला प्रेम. अशा प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलेल्या वातावरणात सोनम आणि आनंद यांच्या प्रेमाची गोष्ट आगळी वेगळी ठरते. या लव्हबर्डचा हा रोमँटीक फोटो पाहून लव इज द एअर असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

पती आनंद आहुजासह सोनम इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये मुकेश अंबानीची लेक ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या साखरपुडासाठी हे दोघे गेले होते. या सोहळ्यानंतर आनंद आणि सोनम सध्या इटलीतच क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना पाहायला मिळत आहेत.

सुरुवातीपासूनच आनंदचं सोनमवर जीवापाड प्रेम आहे. सोनमबाबत आनंद जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळातं. आपल्या लेडी लव्हसाठी आनंद कशाचीही पर्वा करत नाही. आनंद सोनमच्या प्रेमात इतका बुडाला की  तो  कुणाचाही विचार करत नाही. तुर्तास दोघांच्या या खास फोटोला चाहत्यांकडून अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.  पत्नीसह  एन्जॉय करतानाचा हा रोमँटिक क्षण आनंदसाठी नक्कीच स्पेशल असणार.


आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्रँड Bhane चा मालक आहे. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रँड आहे. त्यामुळे बऱ्याचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषार्काठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.

Web Title: Love Is The Air: Sonam Kapoor-Anand Ahuja share passionate kiss in Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.