A lot of unusual team of Padmaan team from Akshay Kumar! Watch video !! | ​अक्षय कुमारच्या वागण्याने वैतागली ‘पॅडमॅन’ची टीम! पाहा व्हिडिओ!!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘पॅडमॅन’च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. येत्या २५ जानेवारीला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलरमध्ये अक्षय एकदम जमून आलाय. या चित्रपटाच्या कथेबद्दल अक्षय कुमार अतिशय गंभीर आहे. चित्रपटाच्या ट्रेलर व गाण्यांमध्येही त्यांच्या वागण्यात  हाच गंभीरपणा दिसतोय. पण ‘पॅडमॅन’च्या सेटवर म्हणाल तर अक्षयचा व्यवहार एकदम उलट होता. होय, सेटवर अक्षयने प्रत्येकाची मजा घेतली. अगदी डायरेक्टरपासून तर सोनम कपूर व राधिका आपटे या त्याच्या हिरोईनपर्यंत सगळ्यांचीच. ‘पॅडमॅन’च्या मेकर्सनी सेटवरचा अक्षयच्या याच दंगामस्तीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात अक्षय प्रत्येकाची मजा घेताना दिसतोय. या व्हिडिओ अक्षय ‘पॅडमॅन’ नाही तर ‘प्रैंकमॅन’ दिसतोय.अक्षय स्वभावाने प्रचंड खट्याळ आहे. त्याच्यासोबत काम करणा-या प्रत्येकाला याचा अनुभव कधी ना कधी आला आहेच. सोनम कपूर आणि राधिका आपटे या दोघीही अशाच अनुभवातून गेल्यात. राधिकाला तर अक्षयने जाम छळते. तिचा फोन लपवण्यापासून तर शॉट देताना हसवण्यापर्यंत सगळे काही त्याने केले. सोनमच्या अंगावर नकली पाल फेकून त्याने धम्माल उडवून दिली.
अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सामाजिक मुद्यावर आधारित चित्रपट आहे. ‘पद्मावत’मुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडणार, अशी आधी चर्चा होती. पण मेकर्सनी आपल्या आधीच ठरलेल्या तारखेत कुठलाही बदल न करण्याचा निर्धार केला. त्यामुळे आता बॉक्सआॅफिसवर ‘पद्मावत’विरूद्ध ‘पॅडमॅन’ असा सामना रंगताना आपण पाहू शकणार आहोत.
‘पॅडमॅन’या चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. 
Web Title: A lot of unusual team of Padmaan team from Akshay Kumar! Watch video !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.