लोपामुद्रा राऊतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:10 PM2018-07-19T17:10:40+5:302018-07-19T17:16:14+5:30

लोपामुद्रा राऊत सलमान खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

Lopamudra Raut's entry in Bollywood | लोपामुद्रा राऊतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

लोपामुद्रा राऊतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्दे 'ब्लड स्टोरी' हा सायको थ्रिलर चित्रपट आहे. व्यावसायिक चित्रपटांसह आर्ट फिल्ममध्येही लोपामुद्रालाही काम करण्याची इच्छा

'मिस इंडिया'ची दुसरी रनर अप आणि 'बिग बॉस'मधील स्पर्धक लोपामुद्रा राऊतला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'ब्लड स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव असून हा सायको थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडचा दबंग खान सलमान सोबत झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 
'ब्लड स्टोरी' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत हेगडे करणार असून हिचकॉकवरून हा चित्रपट प्रेरित असल्याची माहिती आहे. लोपामुद्राचा हिरो म्हणून सध्या पहिली पसंती सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना देण्यात आली आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला. यावेळी लोपामुद्राने सांगितले की, 'माझ्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करताना व पोस्टर लाँच करताना खूप आनंद होतो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा हे पोस्टर पाहिले होते तेव्हा मला असंख्य प्रश्न पडले. पण जेव्हा चित्रपटाची कथा मला समजली तेव्हा हा पोस्टर असा का डिझाईन केला हे समजले. हा पोस्टर सिनेमाच्या कथेला पूर्ण न्याय देतो. 
व्यावसायिक चित्रपटांसह आर्ट फिल्ममध्येही काम करण्याची इच्छा असल्याचे लोपामुद्राने सांगितले. तिला सस्पेन्स चित्रपट आवडत असल्यामुळे तिला सस्पेन्स चित्रपटात काम करायचे होते. चित्रपटात काम करणे हे नवं आव्हान असून या नव्या अनुभव आणि आव्हानासाठी आपण तयार असल्याचे लोपाने सांगितले.
 'ब्लड स्टोरी' चित्रपटाची कथा चांगली असून हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल अशी आशा लोपामुद्राने व्यक्त केली व म्हणाली की , 'या चित्रपटात पुढे नक्की काय होणार याचा अंदाज शेवटपर्यंत लोकांना येणार नाही. '
लोपामुद्राने राजकुमार राव व सलमान खान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली व लवकरच आणखीन एका चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Lopamudra Raut's entry in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.