गेल्या दहा दिवसांतील गणेशोत्सवाचा उत्साह बघण्यासारखा होता. घरोघरी गणपतीचे आगमन झाले आणि आज अनंत चतुर्दशीच्या शेवटच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण आला. आज गणेश चतुर्दशीच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली. अर्थात यावेळी ऐश्वर्या एकटी होती. अभिषेक बच्चन किंवा आराध्या तिच्यासोबत नव्हते.लाल गर्द रंगाची साडी नेसलेली ऐश्वर्या लालबागच्या राजाच्या मंडपात आली आणि सगळ्या नजरा तिच्याकडे वळल्या. ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.सगळ्यांनाच आपल्या लाडक्या अभिनेत्रीला डोळ्यात साठवायचे होते.सोनेरी काठांची लाल गर्द साडी, लाल चुटूक ओठ, कपाळावर लाल कुंकू अन् कानात सोन्याची कर्णफुले, भांगात कुंकू अशी ऐश्वर्या मंडपात येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या नसतील तर नवल.ऐश्वर्याची ही साडी सब्यसाचीने डिझाईन केलेली होती. ऐश्वर्याने केसांत माळलेला गजरा तर अप्रतिम होता. ऐश्वर्याने बाप्पाच्या चरणावर माथे टेकवून आशीर्वाद घेतला. बाप्पासमोर दोन्ही हात जोडून उभी असलेली ऐश्वर्या  आणि  तिचा तो भक्तीभाव सगळ्यांना अपील झाला.ऐश्वर्याला पाहून अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. पण ऐश्वर्या अगदी प्रसन्न चेहºयाने या गर्दीला सामोरी गेली. बाप्पाचे आशीर्वाद घेवून ती तितक्याच शांतपणे बाहेर पडली.ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चनने का केले मुंडण? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर!

ऐश्वर्या राय लवकरच ‘फॅनी खान’ या चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर अशी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या गाणे गाणार असल्याचेही कळतेय. म्हणजेच, ऐश्वर्याच्या अ‍ॅक्टिंग स्कीलसोबतच तिचे सिंगींग स्कीलही आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
Web Title: Looks like a GODDESS: Aishwarya Rai Bachchan reached Lalbagh's courtroom; See photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.