Look ... you have a new song 'Tera Fariyad ...' | पहा... ‘तुम बिन 2’चे नवे गाणे ‘तेरी फरियाद...’

रोमाँटिक चित्रपट म्हणून आजही 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ या चित्रपटाची आठवण केली जाते. या चित्रपटातील ‘कोई फरियाद’ हे गाणे आजही अनेकांच्या ओठांवर आहे. जगजित सिंग व रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणे ‘तुम बिन’चा सिक्वल असलेल्या ‘तुम बिन 2’मध्येही कायम आहे. विशेष म्हणजे हे गीत नव्याने रिलीज करण्यात आले आहे. जगजित सिंग व रेखा भारद्वाज यांच्याच स्वरातील या गाण्याची शब्दरचना शकिल आजमीची आहे. संगीत अंकित तिवारी याचे आहे. ‘तेरी फरियाद’ प्रदर्शित झाल्यावर यु-ट्युबवर चाहत्यांचे लाईक्स मिळत आहेत. या नव्या गाण्यात तेव्हा गाळलेल्या काही शब्दांचा व कडव्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित करीत असलेल्या या चित्रपटात नेहा शर्मा, आदित्य सील व आशीम गुलाटी यांच्या सोबत कंवलजीत सिंग यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 

चला तर पाहूया कसे आहे हे नवे गाणे....


Web Title: Look ... you have a new song 'Tera Fariyad ...'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.