राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा या दोघांची लाडकी लेक आदिराचा वाढदिवस काल रात्री धडाक्यात साजरा झाला. काल ९ डिसेंबरला आदिरा दोन वर्षांची झाली. आदिराच्या वाढदिवसानिमित्त एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सेलिब्रिटी किड्ससह या पार्टीला हजेरी लावली. पार्टी आणखी कुठे नाही तर यशराज स्टुडिओत ठेवली गेली होती. यशराज स्टुडिओ हा चोप्रा कुटुंबाची वडिलोपार्जित संपत्ती आहे. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, कॅटरिना कैफ असे सगळे या पार्टीला पोहाचले.

किंगखान शाहरूख खान लाडक्या अबरामला घेऊन पोहोचला तर करिना कपूर लाडक्या तैमूरला घेऊन पोहोचली. करण जोहरची दोन्ही मुले यश व रूही हेही या पार्टीत होते. याशिवाय शिल्पा शेट्टी तिच्या मुलासोबत पार्टीत आली होती. करिश्मा कपूर, श्रीदेवी, रेखा असे सगळे या पार्टीला हजर होते.

या पार्टीत तैमूर अली खान करण जोहरच्या मुलांसोबत मस्ती करताना दिसला. कदाचित तैमूर काल भलताच खूश होता. मम्मा करिनासोबतही तो मस्ती करताना दिसला. करण व करिना या दोघांनी आपल्या मुलांसोबत पार्टीत अशी मस्त पोज दिली.ALSO READ : ​राणी मुखर्जीला हवे दुसरे बाळ ! आता होतोय पश्चाताप...!!

खरे तर आदिराची पार्टी ही खास मुलांसाठी आयोजित केलेली पार्टी होती. मात्र तरिही या पार्टीत सर्वांनीच एन्जॉय केले. राणी व तिचा पती आदित्य चोप्रा दोघेही आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवतात. कदाचित म्हणूनच या पार्टीतला आदिराचा एकही फोटो सोशल मीडियावर नाही. कदाचित आदिराच्या पुढच्या बर्थ डे पार्टीत आपणा सर्वांची ही इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा करूयात!
Web Title: Look, some special photos of Rani Mukerji's Lake Adi's birthday!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.