लूक असा की, ओळखणे झाले कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 06:33 PM2019-01-08T18:33:13+5:302019-01-08T18:38:48+5:30

बॉलिवूडमध्ये नुकतेच काही लूक प्रदर्शित झाले. त्या भूमिकेत कोण कलाकार आहेत हे समजू देखील शकले नाही. त्यांनी केलेल्या मेकअपमुळे ते ओळखता येणे कठीण झाले.

Look, hard to recognize! | लूक असा की, ओळखणे झाले कठीण!

लूक असा की, ओळखणे झाले कठीण!

googlenewsNext

- रवींद्र मोरे 

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक रिलीज झाला. मात्र यात कोणालाच ओळखता येत नाही की, हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. या अगोदरही अनुपम खेर यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या लुकमध्ये ओळखता आले नाही. शिवाय 2.0 मधील अक्षयच्या भूमिकेलाही विसरता येणार नाही. कारण आहे अभिनेत्यांनी केलेला मेकअप. आज आपण अशाच काही भूमिकांविषयी जाणून घेऊया ज्यात अभिनेत्यांना ओळखता येणे कठीण झाले आहे. 

विवेक ओबेरॉय 
अभिनेता विवेक ओबेरॉय पीएम मोदी यांच्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. अलिकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर बायोपिकचे पोस्टर शेअर केले होते. यात विवेकचा लुक पाहून प्रत्येकजण म्हणत आहे की, पीएम मोदी यांच्या भूमिकेत तो हुबेहूब नरेंद्र मोदी दिसत आहेत.  

अनुपम खेर
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर बनत असलेला बायोपिक 'द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ मध्ये दिसणार आहेत. चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेला पाहून सर्वचजण चकित झाले आहेत. ट्रेलरमध्ये अनुपम खेर हुबेहूब मनमोहन सिंगच वाटत आहेत. 

अक्षय कुमार
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारदेखील आपल्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेत असतो. 2.0 चित्रपटात अक्षय कुमार पक्षी राजाच्या भूमिकेत दिसला होता. अक्कीचा हा लूक पाहून त्याचे चाहते नक्कीच चकित झाले होते.  

अमिताभ बच्चन
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘पा’ चित्रपटात प्रोजेरियाशी पीडित एका मुलाची भूमिका साकारली होती. या भूमिकेत अमिताभ बच्चन अजिबात ओळखले जात नव्हते. त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

 राजकुमार राव
‘राब्ता’ चित्रपटात राजकुमार राव ३२४ वर्षाच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत दिसले होते. या भूमिकेत राजकुमार राव अजिबात ओळखले जात नव्हते. हा लूक पाहून सर्वचजण चकीच झाले होते. या लुकसाठी राजकुमारचे १६ लूक टेस्ट झाल्या होत्या.  

रणबीर कपूर
बॉलिवूडचा हॅँडसम हंक रणबीर कपूरनेदेखील ‘संजू’ चित्रपटात आपला लूक बदलला होता. रणबीरचा लूक पाहून त्याचे फॅन्स त्याला संजय दत्तच समजत होते.  

नवाजुद्दीन सिद्दीकी
अलिकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकचाही ट्रेलर रिलीज झाला. यात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली आहे. ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन हुबेहूब बाळासाहेब ठाकरे वाटत आहेत. त्याचा हा लूक पाहून बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्वचजण अवाक झाले. नवाजुद्दीनचा हा लूक अविस्मरणीय ठरु शकतो.

Web Title: Look, hard to recognize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.