Look, girls' hot dance by Sanya Malhotra and Fatima Sana Shaikh! | ​पाहा, ‘धाकड’ गर्ल्स सान्या मल्होत्रा व फातिमा सना शेख या दोघींचा हॉट डान्स!

‘दंगल’ गर्ल्स सान्या मल्होत्रा (होय, तीच ती आमिरची ‘धाकड’ गर्ल बबीता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री) आणि फातिमा सना शेख (‘दंगल’मध्ये गीता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री) या दोघींची मैत्री सध्या जोरात आहे. होय, या दोघींचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही हेच म्हणाल. सान्या व फातिमा या दोघींच्या धम्माल जुगलबंदीचा एक डान्स व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.‘दंगल’मध्ये सान्या व फातिमा या दोघींनाही आपण कुस्तीचा आखाडा गाजवताना पाहिले. आता या दोघी डान्स फ्लोर गाजवताना दिसत आहेत. यातील सान्या व फातिमा दोघींचाही डान्स पाहून तुम्ही त्यांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. विशेषत: सान्याच्या डान्स मु्व्हज् तुम्हाला वेड लावतील. विदेशी गाण्यावर डान्स करताना फातिमाला सान्या बºयाच ठिकाणी मात देताना या व्हिडिओत दिसतेय. ‘दंगल’नंतर सान्या व फातिमा सोशल मीडियात बरीच लोकप्रीय झालीय. 

ALSO READ : ​‘धाकड गर्ल’ सान्या मल्होत्राचा हा डान्स व्हिडिओ पाहाच!

सान्याबद्दल सांगायचे तर, व्हायरल झालेला सान्याचा हा पहिला डान्स व्हिडिओ नाही. सतत नवे काहीतरी शेअर करून ती तिच्या चाहत्यांना रोज नवी ट्रिट देत असते. अलीकडे तिने स्वत:चा असाच एक धमाकेदार डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता.  तिच्या या धमाकेदार डान्स व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होतो. इतका की,पहिल्या १८ तासांमध्ये ८० हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. या व्हिडिओत सान्या एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसली होती. ‘दंगल’नंतर सान्याच्या हाती तूर्तास कुठलाही चित्रपट नाही. याऊलट फातिमा आमिरच्याच दुसºया एका चित्रपटात दिसणार आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये फातिमा दुस-यांदा आमिरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात फातिमा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अमिताभ बच्चन व कॅटरिना कैफ यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
फातिमाचा हा चित्रपट आपण पाहूच. पण त्यापूर्वी तिची सान्यासोबतची जुगलबंदी तुम्ही पाहायला हवी. शिवाय ही जुगलबंदी कशी वाटली, तेही आम्हाला कळवायला हवे.
Web Title: Look, girls' hot dance by Sanya Malhotra and Fatima Sana Shaikh!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.