मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सोबतच चर्चा आहे ती आमिरच्या सिनेमातील दंगल गर्लची. ही दंगल गर्ल कोण असा प्रश्न विचारला जात होता. एकेकाळची बालकलाकार असलेली अभिनेत्री फातिमा सना शेख ही आमिरच्या सिनेमात 'दंगल गर्ल' साकारणार असल्याचं उघड झालं. मात्र बालकलाकार असलेल्या फातिमाचं 'दंगल'च्या निमित्ताने रसिकांना दर्शन घडलं नव्हतं. इतकंच नाही तर दंगलच्या प्रोमोमध्येही ती दिसली नाही. त्यामुळं फातिमाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती. अखेर फातिमा सना शेखचं नुकतंच दर्शन घडलं. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी कॅमे-यांनी फातिमाला कैद केलं.एक नजर टाकूया फातिमा सना शेखच्या अभिनय कारकिर्दीवर...  
'चाची 420' या सिनेमात फातिमा सना शेख हिन अभिेनेता कमल हासन आणि तब्बू यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. फातिमानं साकारली ही गोंडस चिमुकली रसिकांच्या आजही स्मरणात आहे.


 
 
किंग खान शाहरुख आणि जुही चावला यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'वन टू का फोर' या सिनेमातही फातिमानं बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 
2008 साली आलेल्या 'तहान' या सिनेमात तिनं झोया ही व्यक्तीरेखा साकारली होती.2012 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या कॉमेडी सिनेमा 'बिट्टू बॉस' आणि 2013 साली आलेल्या 'आकाश वानी' या सिनेमातही फातिमाचं रसिकांना दर्शन घडलं. याशिवाय फातिमा छोट्या पडद्यावरही झळकली. 'अगले जनम मोहे बिटियाँ ' ही किजो या मालिकेत तिनं सुमन ही भूमिका साकारली होती.

 
आता फातिमाचं लवकरच रुपेरी पडद्यावर कमबॅक होतंय. मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात फातिमानं भूमिका साकारलीय. यांत ती आमिरच्या लेकीच्या भूमिकेत पाहायला मिळेल.


Web Title: Look at the first glimpse of 'Dangal Girl'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.