Look at Dharmendra-Bobby Deol on 'Yamla Pagla Deewana' set! | ‘यमला पगला दीवाना’च्या सेटवर धर्मेंद्र-बॉबी देओलचा पहा ‘शोले’ अंदाज!

देओल परिवाराचा ‘यमला पगला दीवाना’ या कॉमेडी सीरिजच्या नव्या पार्टच्या शूटिंगला आज सुरुवात करण्यात आली आहे. अभिनेते धर्मेंद्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपला करिष्मा दाखविणार आहेत. होय, देओल परिवाराच्या ‘यमला पगला दीवाना-फिर से’ या चित्रपटाच्या शूटिंगला आज सुरुवात करण्यात आला असून, शूटिंगच्या सेटवरील एक फोटोही सध्या व्हायरल होत आहे. फोटोमध्ये धर्मेंद्र यांच्यासह बॉबी देओल दिसत असून, दोघांनी ‘शोले’ स्टाइल पोज दिली आहे. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये फक्त सनी देओलची कमतरता जाणवत आहे. खरं तर ‘यमला पगला’ सीरिजचे पहिले दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशात तिसºया चित्रपटाच्या निर्मितीचा विचार कुठल्या आधारे केला गेला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याविषयी जेव्हा अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘दोन्ही चित्रपटांमध्ये आम्ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, त्यांना खूप हसविले. आता या नव्या भागात आम्ही लोकांना रडविणार आहोत. 

या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासह सनी देओल आणि बॉबी देओल काम करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन पंजाबी चित्रपट निर्माते नवनीत सिंग करणार आहे. हा चित्रपट कॉमेडी आणि इमोशनवर आधारित असेल. देओल परिवारातील आणखी एक सदस्य म्हणजेच सनीपाजीचा मुलगा करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करीत आहे. 

सध्या चित्रपटाचे शूटिंग मनाली येथे सुरू असून, सनी देओल त्याच्या सोशल अकाउंटवर सेटवरील काही फोटोज् शेअर करीत असतो. या चित्रपटात अ‍ॅक्शन आणि रोमान्स बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच करण मुंबई येथे स्पॉट झाला होता. करणने स्वत:हून ‘यमला पगला दिवाना-२’चे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम बघितले होते. 
Web Title: Look at Dharmendra-Bobby Deol on 'Yamla Pagla Deewana' set!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.