Little Nawab's faint sensation by listening to the name of cancer, something happened after that | कॅन्सरचे नाव ऐकून छोटे नवाबचे उडाले होश,त्यानंतर घडले असे काही

कॅन्सर या आजाराचं नाव ऐकूनच अनेकांना धक्का बसतो. सामान्य असो, गर्भश्रीमंत असो किंवा मग सेलिब्रिटी कुणीही या आजारापासून वाचू शकलेले नाही. त्यामुळे रिल लाइफ असो किंवा रिअल लाइफ प्रत्येकालाच कॅन्सरच्या नावानेच धडकी भरते. असंच काहीसं अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानबाबत घडलं. सैफला अचानक डॉक्टरकडून पोटाचा कॅन्सर झाल्याचं कळतं आणि त्याला धक्काच बसतो. काही काळ स्तबध राहून तो विचार करतो आणि आपली जगण्याची शैली बदलतो. हे रिअल लाइफमध्ये घडलं नसून रिल लाईफमध्ये घडणार आहे. आगामी कालाकांडी सिनेमातील सैफवर चित्रीत करण्यात आलेला हा सीन. कालाकांडी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये सैफवर चित्रीत करण्यात आलेला हा सीन पाहायला मिळतो. हा ट्रेलर पाहून हा सिनेमा डार्क कॉमेडी असल्याचे वाटतं. अक्षत वर्मा दिग्दर्शित या सिनेमात सैफसह दीपक डोबरियाल, विजय राज, कुणाल रॉय कपूर, अक्षय ओबेरॉय,इशा तलवार, अमायरा दस्तुर, शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डार्क कॉमेडी सिनेमात बोल्डनेसचा तडकाही असणार आहे. बोल्ड डायलॉग या सिनेमात ऐकायला मिळणार आहेत. भाड मे गई पीएचडी, भाड में गई स्कॉलरशिप, पूरे देश को कामसूत्र सिखा दूँगी असे बोल्ड डायलॉग या सिनेमात आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. यांत सैफने केसाला अनेक रबरबँड लावल्याचे पाहायला मिळालं होतं. हा सिनेमा 12 जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सैफच्या बाजार हा सिनेमाही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Also Read: ​‘कालाकांडी’मध्ये अशा विचित्र रूपात दिसणार सैफ अली खान!

सिनेमाच्या फर्स्ट लूकनंतर लगेच सिनेमाचा टीजरही रिलीज करण्यात आला. यात सैफचा अवतार तुम्हा-आम्हाला आश्चर्याचा धक्का देणारा असाच पाहायला मिळाला. या लूकमध्ये सैफने पांढ-या रंगाचा शर्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचे फर जॅकेट घातलेले आहे. त्याच्या डोक्यावर अनेक वेण्या बांधलेल्या आहेत.डोळ्यांच्या चहूबाजूंनी काळेपणा दिसतोय. असे का,याचा अंदाज तूर्तास बांधता येणार नाही. पण सैफचा लूक नक्कीच जबरदस्त आहे.टीजरचे म्हणाल तर टीजरच्या सुरूवातीला सैफ नॉर्मल लूकमध्ये दिसतो. तिच्यासमोर एक महिला अतिशय अवघडलेल्या स्थितीत उभी आहे. यानंतर काही क्षणात सैफ पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळतो. 
Web Title: Little Nawab's faint sensation by listening to the name of cancer, something happened after that
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.