‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अहाना कुमरा सध्या आॅस्ट्रेलियात आहे. पण या आॅस्ट्रेलिया ट्रिपच्या काही फोटोंमुळे अहानाला ट्रोल व्हावे लागलेय. होय, अहाना अलीकडे डार्विन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आॅस्ट्रेलियात गेली होती. याचदरम्यानचे काही फोटो अहानाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. या फोटोत अहाना कलरफुल बिकनीत दिसतेय. पण अहानाने हे फोटो पोस्ट केलेत आणि अनेक युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. ‘फॅट थोडे कमी व्हायला हवे,’ असे कुणी लिहिले तर कुणी ‘अहाना, तुला जिममध्ये जाण्याची गरज आहे,’ असे लिहून अहानाची खिल्ली उडवली. काहींनी तिला वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला. अर्थात काही युजर्स अहानाला पाठींबा देतानाही दिसले. काही लोक बोलणारच, तुला वाटते ते कर, अशा शब्दांत त्यांनी अहानाचा सपोर्ट केला.

खुद्द अहानाचे म्हणाल तर तिने या कमेंट्स अजिबात गंभीरपणे घेतल्या नाहीत. या ट्रोलिंगनंतरही तिने आपले अनेक फोटो शेअर केलेत. शेअरच केले नाही तर ट्रोलिंग करणाºयांना अप्रत्यक्षपणे फटकारलेही. ‘डू वुई रिअली शेप दी वर्ल्ड’, असे तिने म्हटले. अर्थात समजणाºयांना इशारा पुरेसा असतो. ALSO READ : अहाना कुमरा जवळ जवळ झाली होती बाद! नशिबाने मिळाला ‘Lipstick under my burkha’!!

अहाना कुमरा हिच्याबद्दल सांगायचे तर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’या चित्रपटात काम करण्याची संधी ती जवळजवळ घालवून बसली होती. पण नशिबाने साथ दिली आणि हा चित्रपट अहानाच्या वाट्याला आला. नशिबाची साथ यासाठी कारण, हा चित्रपट मिळण्याबद्दल अहाना स्वत:ला नशिबवाण मानते. या चित्रपटाची आॅफर आली तेव्हा अहाना एका टीव्ही शृंखलेत बिझी होती. तारखांचा मेळ जमत नसल्याने अहानाला मनात असतानाही या चित्रपटाला नकार द्यावा लागला होता. पण अचानक ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ची शूटींग लांबली आणि हा चित्रपट अहानाला मिळाला. शूटींग लांबल्यावर यातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा अहानाला विचारणा झाली. यावेळी अहानाकडे नकार देण्याचे काही कारणच नव्हते. कारण तिच्याकडे तारखा होत्या. अर्थात चित्रपट मिळवणे तरिही इतके सोपे नव्हते. कारण यासाठी तिला आॅडिशन द्यावे लागणार होते. अहानाने तेही केले. रितसर या चित्रपटासाठी आॅडिशन दिले. ती या आॅडिशनमध्ये पास झाली आणि अहानाची चित्रपटात वर्णी लागली.

Web Title: 'Lipstick Under My Burkha' actress bollywood photos due to troll!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.