In the life of Siddharth Malhotra, this beautiful lady took the place of Bhati. | सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यात या सुंदरीने घेतली आलिया भट्टची जागा !

सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडमधल्या अशा अभिनेत्यांनी पैकी एक जो नेहमी आपल्या लव्हलाईफला घेऊऩ चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थचे नाव आलिया भट्टबरोबर जोडण्यात आले होते.  दोघांनी करण जोहरच्या 'स्टुडण्ट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याचे समजते आहे. मागच्या काही दिवसांपासून आलियाचे तिचा एक्स बॉयफ्रेंड अली दादरकर बरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. अली आणि आलियाच्या भेटीगाठी पुन्हा वाढल्या आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया अलीला डेट करत होती मात्र ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अली आणि आलियाचे ब्रेकअप झाले.  मात्र आता आणखीन एक बातमी हाती लागली आहे.  

सिद्धार्थने आपल्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्टनुसार या पार्टीत एक मिस्ट्रीगर्ल सुद्धा दिसली. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ जेव्हा पार्टीतून परत जात होता त्यावेळी त्याच्यासोबत ही मिस्ट्रीगर्लसुद्धा होती. 

एकता कपूरच्या घरी दिवाळीत झालेल्या पार्टीत सिद्धार्थ आणि आलिया शेवटचे एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर दिसले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया आपल्या पूर्व प्रियकारसोबत दिसली होती. 

सिद्धार्थच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर 9 फेब्रुवारीला त्याचा अय्यारी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या अ‍ॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.  सिद्धार्थ यात एक आर्मी ऑफिसर साकारणार आहे.अय्यारीमध्ये सिद्धार्थ सक्सेना नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारतोय. अय्यारी हा एक क्राइम-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात आपल्याला लंडन, काश्मीर आणि दिल्ली दिसणार आहे. खऱ्या लोकेशन्सवर जाऊन शूट करण्यासाठी दिग्दर्शक नीरज पांडे ओळखला जातो. याचित्रपटाचे मुख्य चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. 

Web Title: In the life of Siddharth Malhotra, this beautiful lady took the place of Bhati.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.