The last video of 'this' ...! The last glimpse of Sridevi in ​​'this' video seen !! | ‘हा’ अखेरचा व्हिडिओ...! ‘या’ व्हिडिओत दिसली श्रीदेवींची अखेरची झलक!!

बॉलिवूडची ‘चांदनी’ निखळली.  दुबईत श्रीदेवींचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी भारतात आली तेव्हा, सर्वांना एकक्षण विश्वास बसेना. ही अफवा तर नसेल, असे सर्वांना वाटेल. किंबहुना ही अफवाच ठरावी, असेच अनेकांनी प्रार्थना केली. पण ही अफवा नव्हती. बॉलिवूडची ही ‘चांदनी’ आता कधीच उगवणार नव्हती. श्रीदेवींच्या निधनाने बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोककळा पसरली.
शनिवारी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी यांच्यासोबत श्रीदेवी दुबईत होत्या. भाचा मोहित मारवाह याच्या लग्नात हे तिघेही सामील झाले होते. या लग्नाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात श्रीदेवींची एक झलक पाहायला मिळते. श्रीदेवी सगळ्यांना फ्लार्इंग किस देत आहेत...हसून सगळ्यांना अभिवादन करत आहेत...हिरव्या रंगाचा लहंगा, माथ्यावर बिंदी, असा त्यांचा रॉयल लूक यात दिसतोय.चार दिवसांपूर्वीचा हा त्यांचा व्हिडिओ त्यांचा अखेरचा व्हिडिओ असे म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ शूट झाला त्याक्षणी व्हिडिओतील ही ‘सुंदरी’ चा दिवसानंतर आपल्यात नसेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण नियती कदाचित टपून बसली होती. शनिवारी रात्री श्रीदेवींची प्रकृती अचानक बिघडली. हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.
 श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया अशा अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

ALSO SEE : ​मुलगी खुशी आणि मनीष मल्होत्रासोबतचा श्रीदेवींचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा!

‘न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!’ असे ट्विट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवी यांच्या निधनापूर्वी केले होते. असे ट्विट करत त्यांनी आपल्या मनातील एकप्रकारे भिती व्यक्त केली होती का? त्यानंतर काहीच क्षणात श्रीदेवींच्या निधनाची बातमी आली. अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांच्या कुटुंबियांनीच   ह्रदयविकार झटका आला त्यावेळी कळवले होते का? असा प्रश्न सोशल मीडियावर चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 
Web Title: The last video of 'this' ...! The last glimpse of Sridevi in ​​'this' video seen !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.