Kryti Sanan, who is taking horse training for 'Panipat', will start shooting shortly | 'पानीपत'साठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेय क्रिती सॅनन, लवकरच सुरू होणार शूटिंग

अभिनेत्री कंगना राणौतनंतर क्रिती सॅननदेखील घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेते आहे. क्रिती सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. क्रिती आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानीपत'साठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतेय. पानीपतमध्ये तिच्यासोबत अर्जून कपूर आणि संजय दत्त दिसणार आहेत. पानीपतच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे. हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. यात पानीपतचे तिसरे युद्ध दाखवले जाणार आहे. पनीपत या सिनेमाला भव्यदिव्य करण्यासाठी आशुतोष गोवारीकर कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोललं जात आहे. त्यासाठीच आशुतोष शनिवारवाड्याचा  भव्यदिव्य असा सेट उभारणार आहेत. हुबेहूब शनिवारवाडा साकारण्याची जबाबदारी त्यांनी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा सेट उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तो भव्यदिव्य असावा असा आशुतोष गोवारीकर यांचा प्रयत्न आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या साम्राज्याचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तो भव्यदिव्य असावा असा आशुतोष गोवारीकर यांचा प्रयत्न आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या. आशुतोष गोवारीकर  6 डिसेंबर 2019  रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

क्रिती तिचा कथित बॉयफ्रेंड सुशांत सिंग सोबत आपल्याला स्क्रिन शेअर करताना दिसू शकते.‘डर्टी डान्सिंग’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला आहे. या डान्सआधारित चित्रपटासाठी प्रोड्यूसरला एका कोरिओग्राफरचा शोध आहे.. कास्ट आणि क्रू फायनल होताच सुशांत व क्रिती यासाठी तयारी सुरू करणार आहेत. या चित्रपटात क्रिती व सुशांत जबदस्त डान्स करताना दिसणार आहे. क्रिती व सुशांत या रिअल लाईफ कपला हा एकत्र असा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी ही जोडी ‘राबता’मध्ये दिसली होती. अर्थात हा चित्रपट दणकून आपटला होता.
Web Title: Kryti Sanan, who is taking horse training for 'Panipat', will start shooting shortly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.