कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:20 PM2018-12-11T18:20:53+5:302018-12-11T18:21:57+5:30

कॉफी विथ करणच्या या आगामी भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले आहे. करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रभास, राणा आणि राजामौली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून याविषयी सांगितले आहे.

Koffee With Karan 6: Prabhas, Rana Daggubati And SS Rajamouli Are Karan Johar's New Guests | कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात

कॉफी विथ करणमध्ये दिसणार बाहुबलीची टीम, प्रभास पहिल्यांदाच झळकणार य कार्यक्रमात

googlenewsNext
ठळक मुद्देकॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आजवरच्या सिझनमध्ये आपल्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनाच पाहायला मिळाले आहे. पण या सिझनमध्ये आपल्याला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारे प्रभास, राणा आणि राजामौली दिसणार आहेत.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या म्हणजेच सहाव्या सिझनमध्ये आजवर काजोल-अजय देवगण, सैफ अली खान-सारा अली खान, अक्षय कुमार-रणवीर सिंग, दीपिका पादुकोण-अलिया भट, अर्जुन कपूर-जान्हवी कपूर यांसारखे कलाकार झळकले आहेत. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना बाहुबली फेम प्रभासला पाहायला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत राणा दग्गुबाती, दिग्दर्शक एस एस राजामौली देखील झळकणार आहेत. बाहुबलीच्या टीममधील या महत्त्वाच्या सदस्यांसोबत या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर गप्पा गोष्टी करणार आहे. 

कॉफी विथ करणच्या या आगामी भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले आहे. करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रभास, राणा आणि राजामौली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून याविषयी सांगितले आहे. करणच्या या पोस्टवर अनेक लाइक्स असून हा भाग बघण्यास आम्ही आतूर झाले आहोत अशी अनेकांनी कमेंट केली आहे.

प्रभास गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण बाहुबली या चित्रपटामुळे त्याला जगभरात लोकप्रियता मिळाली. आज त्यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. तसेच राणा दग्गुबातीचे देखील या चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडले होते. बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. आता या चित्रपटाविषयी कॉफी विथ करणच्या भागात गप्पा रंगणार यात काहीच शंका नाही. 

कॉफी विथ करण 6 च्या इतर भागांप्रमाणे हा भाग देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी या टीमला खात्री आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आजवरच्या सिझनमध्ये आपल्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटींनाच पाहायला मिळाले आहे. पण या सिझनमध्ये आपल्याला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारे प्रभास, राणा आणि राजामौली दिसणार आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक गुपिते या भागात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. 

प्रभास सध्या साहो या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तो श्रद्धा कपूरसोबत झळकणार असून या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. 

Web Title: Koffee With Karan 6: Prabhas, Rana Daggubati And SS Rajamouli Are Karan Johar's New Guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.