Koffee With Karan 6: सिद्धार्थ मल्होत्रा-आदित्य रॉय कपूरवर नाराज होऊ शकते मलायका, अर्जुन कपूरवर केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:47 PM2019-02-04T15:47:16+5:302019-02-04T15:48:04+5:30

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणच्या आगामी भागात बॉलिवूडचे दोन हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा व आदित्य रॉय कपूर सहभागी झाले होते

Koffee With Karan 6: Comment on Malaika, Arjun Kapoor, Malaika will be Angered on Sidharth Malhotra and Aditya Roy | Koffee With Karan 6: सिद्धार्थ मल्होत्रा-आदित्य रॉय कपूरवर नाराज होऊ शकते मलायका, अर्जुन कपूरवर केली कमेंट

Koffee With Karan 6: सिद्धार्थ मल्होत्रा-आदित्य रॉय कपूरवर नाराज होऊ शकते मलायका, अर्जुन कपूरवर केली कमेंट

googlenewsNext


निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणच्या आगामी भागात बॉलिवूडचे दोन हॅण्डसम हंक सिद्धार्थ मल्होत्राआदित्य रॉय कपूर सहभागी झाले होते. या शोमध्ये चर्चित रॅपिड फायर राउंडमध्ये सिद्धार्थ व आदित्यला अर्जुन कपूरशी निगडीत एक प्रश्न विचारला. त्यावर सिद्धार्थ व आदित्यने दिलेले उत्तर ऐकून अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा खान नाराज होऊ शकते.

शोमध्ये करण जोहरने आदित्य व सिद्धार्थला विचारले की, अर्जुन कपूरने कोणत्या अभिनेत्रीला डेट केले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देताना सिद्धार्थ व आदित्यने मलायका नाही तर परिणीती चोप्राचे नाव घेतले. आता आदित्य व सिद्धार्थच्या उत्तरामुळे परिणीती व अर्जुन कपूर इंप्रेस होऊ शकतात. मात्र मलायकाला वाईट वाटू शकते. या भागात पुन्हा एकदा करणने अर्जुन कपूर व मलायका अरोराचे अफेयर कन्फर्म केले. यापूर्वी देखील हार्दीक पांड्या व केएल राहुल यांच्या वादग्रस्त एपिसोडमध्ये करणने या अफेयर बाबत खुलासा केला होता. 




आदित्य रॉय कपूरला त्याची खास मैत्रिण दीवा धवनबद्दल विचारण्यात आले, त्यावर तो म्हणाला की, आमच्या नात्याबद्दल जे बोलले जात आहे. ती फक्त अफवा आहे. मी सिंगल आहे. दीवा खूप चांगली मैत्रिण आहे. दुसरीकडे करणने सिद्धार्थला आलिया भटसोबतच्या नात्याबद्दल विचारले. त्यावर सिद्धार्थ म्हणाला की, ब्रेकअपनंतर मी आलियाला नाही भेटलो. आमच्या नात्यात ब्रेकअपनंतर अजिबात कडवटपणा नाही. आमच्या ब्रेकअपला खूप काळ लोटला आहे. काही कारणास्तवच दोन जण वेगळे होण्याचा विचार करतात. त्यावेळी आमच्या नात्यात बरेच काही होत होते. मात्र जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडता तेव्हा फक्त चांगल्या आठवणी स्मरणात ठेवल्या पाहिजेत. 



 

Web Title: Koffee With Karan 6: Comment on Malaika, Arjun Kapoor, Malaika will be Angered on Sidharth Malhotra and Aditya Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.