Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:17 PM2019-03-04T15:17:55+5:302019-03-04T15:37:13+5:30

परीक्षक आणि करण यांनी मिळून कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता.

Koffee Awards 2019: Ajay Devgn, Sara Ali Khan, Kajol and Diljit Dosanjh steal the show | Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी

Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी

googlenewsNext
ठळक मुद्देअजयला त्याच्या सर्वोत्कृष्ट उत्तरासाठी ऑडी ए फाईव्ह स्पोर्ट बॅक कार पुरस्कार म्हणून देण्यात आली. अजयला विचारण्यात आले होते की, कोणत्या अंधश्रद्धेवर लोकांनी विश्वास ठेवणे बंद करावे... त्यावर अजयने म्हटले होते की, करणने या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे बंद करावे की, त्याचे सगळे क आद्याक्षरापासून सुरू होणारे चित्रपट चालतात... कारण काल चित्रपटाचे काय झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमात हजेरी लावून अनेक सेलिब्रेटींनी सूत्रसंचालक करण जोहरसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आलिया भट-दीपिका पादुकोण, अक्षय कुमार-रणवीर सिंग, आमिर खान, जान्हवी कपूर-अर्जुन कपूर, सारा अली खान-सैफ अली खान, वरूण धवन- कॅटरिना कैफ, प्रियांका चोप्रा-करिना कपूर यांसारखे अनेक सेलिब्रेटी आजवर कॉफी विथ करण या कार्यक्रमात उपस्थित राहिले.  

करण जोहरच्याकॉफी विथ करण या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण त्याआधी एक खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या भागात करण जोहरसोबत आपल्याला काही परीक्षक देखील दिसले. हे परीक्षक आणि करण यांनी मिळून यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या एक मताने या कार्यक्रमात आलेल्या काही सेलिब्रेटींना कॉफी विथ करण पुरस्कार देण्यात आले.

कॉफी विथ करण ६ च्या पुरस्काराचे विजेते
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) 
दलजीत दोसांज
दलजीत दोसांजने दिलेल्या उत्तराने त्याच्यात असलेला इनोसेन्स दिसून आला असे परीक्षकांचे म्हणणे होते. या पुरस्काराविषयी दलजीत सांगतो, मी या पुरस्कारासाठी सगळ्यांचे आभार मानतो. आता मी रोज रात्री या कपमधूनच दूध पिणार आहे.

सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री) 
सारा अली खान
या पुरस्कारासाठी सारा, भूमी पेडणेकर, रिया कपूर यांच्यात चढाओढ होती. पण हा पुरस्कार साराने पटकावला. 

सर्वोत्कृष्ट पोषाख (पुरुष)
विकी कौशल
रणवीर सिंग, सैफ अली खान, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर आणि विकी कौशल यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण विकी या पुरस्काराचा मानकरी ठरला.

सर्वोत्कृष्ट पोषाख (स्त्री)

करिना कपूर

या पुरस्कारासाठी करिना कपूर, दीपिका पादुकोण यांच्यात चढाओढ होती. पण करिनाचा पोषाख सगळ्यांना अधिक आवडला. पुरस्कार स्वीकारताना ती म्हणाली, करण आणि या पुरस्काराचे परीक्षक यांचे मी धन्यवाद मानते. पण मला कप नाही ऑडी पाहिजे.



 

सर्वोत्कृष्ट क्षण
रणवीर सिंगने केली अक्षय कुमारची नक्कल
रणवीर सिंगने अक्षयची नक्कल केली होती. तो म्हणाला होता की, अक्षयने त्याला सल्ला दिला आहे की, लग्न, वाढदिवस, मुंडन अशा सगळ्या समारंभात पैशांसाठी परफॉर्न्स द्यायचा...

सर्वोत्कृष्ट परफॉर्मर (पुरुष)
रणवीर सिंग
रणवीर आणि अक्षय कुमार या दोघांनी या कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्यात पुरस्कारासाठी चढाओढ होती. पण रणवीर विजेता ठरला. 


सर्वोत्कृष्ट परफॉर्मर (स्त्री)
काजोलने दिलेल्या उत्तरांमुळे तिने सगळ्या परीक्षकांचे मन जिंकले

सर्वोत्कृष्ट भाग
दलजीत दोसांज - बादशहा
दलजीत दोसांज - बादशहा यांच्या भागाला सर्वात जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. तसेच सोशल मीडियावर देखील या भागाची चर्चा झाली होती. 

या सिझनचे सर्वोत्कृष्ट उत्तर
अजय देवगण
अजयला त्याच्या सर्वोत्कृष्ट उत्तरासाठी ऑडी ए फाईव्ह स्पोर्ट बॅक कार पुरस्कार म्हणून देण्यात आली. अजयला विचारण्यात आले होते की, कोणत्या अंधश्रद्धेवर लोकांनी विश्वास ठेवणे बंद करावे... त्यावर अजयने म्हटले होते की, करणने या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे बंद करावे की, त्याचे सगळे क आद्याक्षरापासून सुरू होणारे चित्रपट चालतात... कारण काल चित्रपटाचे काय झाले हे सगळ्यांनाच माहीत आहे. 

Web Title: Koffee Awards 2019: Ajay Devgn, Sara Ali Khan, Kajol and Diljit Dosanjh steal the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.