Koena Mitra gets money out of exchange for money! | ​ कोएना मित्राला मिळाली पैशाच्या बदल्यात नाईट आऊटची आॅफर!

अभिनेत्री कोएना मित्रा आज बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही. पण सध्या ती चर्चेत आली आहे. होय, गेल्या अनेक दिवसांपासून कोएना एका अनोळखी फोन कॉल्समुळे वैतागली आहे.
दोनच दिवसांआधी ‘बाहुबली फेम’ स्कार्लेट विल्सन  सेटवर गैरवर्तनाची बळी ठरली होती. सहअभिनेत्याने स्कार्लेटला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. स्कार्लेटनंतर आता कोएना मित्रा अशाच गैरवर्तनाची बळी ठरली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून कोएनाला अश्लिल फोन कॉल्स येत आहेत. याप्रकरणी कोएना मुंबईच्या ओशीवारा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भांदविच्या कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलैपासून कोएनाला  अनोळखी क्रमांकावरून फोन कॉल्स येणे सुरु झाले. फोन करणाºया व्यक्तीने कोएना सोबत रात्र घालवण्याची आॅफर दिली. प्रारंभी कोएनाने या कॉल्सकडे दुर्लक्ष केले. मात्र २६ जुलैला तिने कॉल रिसीव्ह करताच, समोरच्या अनोळखी व्यक्तीने तिला नाईट आऊटसाठी विचारले. या व्यक्तीने गेल्या काही दिवसांत कोएना ५० ते ६० कॉल्स केलेत. यामुळे कोएना भडकली व तिने पोलिसांत तक्रार नोंदवणेच योग्य समजले. सध्या या अनोळखी क्रमांकाचे लोकेशन शोधले जात आहे.

ALSO READ : ​सहअभिनेत्याने केले गैरवर्तन! ‘बाहुबली’ची अभिनेत्री स्कार्लेट विल्सनने दिले असे उत्तर!!

अशा प्रकारचा त्रास सहन करणारी कोएना एकटी नाही. याआधी कोएनाप्रमाणेच अनेक अभिनेत्रींना अशा प्रसंगांना बळी पडल्या आहेत. सोनिका भदौरिया, सोनू वालिसा, अवनी मोदी,श्रुती हासन यापैकीच काही नावे. अर्थात या अभिनेत्रींनी अशा घटनेनंतर शांत न बसता पोलिसांत धाव घेतली.
कोएना मित्राने ‘मुसाफिर’,‘हे बेबी’,‘डार्क रोमान्स’ यासारख्या चित्रपटांत काम केले आहे.
  
Web Title: Koena Mitra gets money out of exchange for money!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.